Rajnish Seth - Sanjay Pande Saam TV
मुंबई/पुणे

रजनीश सेठ राज्याचे नवे DGP, मुंबई पोलीस आयुक्तपदी संजय पांडेंची वर्णी

नगराळे यांच्यावरती महाविकास आघाडीतील नेते नाराज असल्याची चर्चा होती.

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

मुंबई: परमवीर सिंग (Parambir Singh) यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन उचलबांगडी केल्यानंतर नवे पोलीस आयुक्त म्हणून हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता पुन्हा हेमंत नगराळे यांची बंदली करण्यात आली आहे. तर मुंबईचे नवे पोलीस आयुक्त संजय पांडे असणार आहेत. संजय पांडेंच्या (Sanjay Pande) नियुक्तीला विरोध झाल्याने रजनीश सेठ पोलीस महासंचालक झाले आहेत. तर संजय पांडेंची वर्णी ही मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी लागली आहे. नगराळे यांच्यावरती महाविकास आघाडीतील नेते नाराज असल्याची चर्चा होती.

कोण आहेत संजय पांडे?

संजय पांडे हे १९८६ च्या बॅचचे अधिकारी आहेत. पांडे हे पोलिस महासंचालक असताना हायकोर्टाच्या निर्णयामुळे त्यांना पायउतार व्हाव लागलं होते. मात्र महाविकास आघाडी सरकारने पांडे यांना पुन्हा पोलीस आयुक्त पदावर बसवले आहे. पांडे हे जुलैमध्ये निवृत्त होणार असून सहा महिन्याचा कालावधी त्यांच्याकडे असणार आहे.

मनू कुमार श्रीवास्तव हे राज्याचे मुख्य सचिव होणार आहेत. राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती आज निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी मनू कुमार श्रीवास्तव (गृह विभाग) मनोज सौनिक (अर्थ विभाग) सुजाताई सौनिक आणि नितीन करीर (महसूल) यांच्या नावाची चर्चा होती. पण ज्येष्ठता या निकषानुसार मनू कुमार श्रीवास्तव यांना मुख्य सचिव पदाची जबाबदारी मिळणार आहे. १९८६ च्या बॅचचे मनू कुमार श्रीवास्तव आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : पुणेकरांना मोठा दिलासा; सिंहगड रोडवरील नवा उड्डाणपूल लवकरच होणार सुरू

Shocking: शाळेत हत्येचा थरार! नववीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्याला चाकूने भोसकलं, जमावाकडून शाळेची तोडफोड

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Chandrabhaga River Flood : पंढरपुरात ४०० नागरिकांचे करणार स्थलांतर; चंद्रभागेच्या पुराने कुटुंब बाधित

Bail Pola 2025: यंदा बैलपोळा सण कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि महत्व

SCROLL FOR NEXT