भाजपने मनाचा मोठेपणा दाखवला त्याबद्दल आभार- खा. रजनी पाटील Saam TV
मुंबई/पुणे

भाजपने मनाचा मोठेपणा दाखवला त्याबद्दल आभार- खा. रजनी पाटील

काँग्रेसचे खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेले जागेसाठी पोटनिवडणूक होणार होती.

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: काँग्रेसचे खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेले जागेसाठी पोटनिवडणूक होणार होती. त्यासाठी काँग्रेसकडून रजनी पाटील (Rajni Patil) यांना उमदवारी देण्यात आली होती. भाजप (BJP) सुरुवातील निवडणूक बिनविरोध करणार असं चित्र होतं, मात्र अचानक भाजपने आपला उमेदवार दिला आणि निवडणून काँग्रेससाठी (Congress) अवघड बनली. मात्र काँग्रेसच्या विनंतीनंतर भाजपने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि रजनी पाटील बिनविरोध खासदार झाल्या. त्यानंतर त्या माध्यमांसमोर आल्या आणि बोलताना त्या म्हणाल्या ''मला आज माझा लहान भाऊ राजीव सातव यांची आठवण येत आहे. सगळ्यांनी समजूतदारपणा दाखवला दिल्लीत मला आशीर्वाद मिळाले.

राज्यातून देखील अनेकांनी पुढाकार घेतला त्यामुळे मला संधी मिळाली. भाजपने मनाचा मोठेपणा दाखवला त्याबद्दल त्यांचे आभार. प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर ही काँग्रेसने उमेदवार दिला नव्हता. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर मलाच उमेदवारी दिली होती, आताही राजीव सातव यांच्या निधनानंतर मलाच उमेदवारी दिली आहे. बिनविरोध निवडणुकीचा पायंडा काँग्रेसने जपला, तिच परंपरा पाहायला मिळत आहे. चंद्रकांतदादा पाटील काय बोलले होते याबद्दल मला काही बोलायचे नाही.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT