देशमुखांना भाजपचा प्रचार भोवणार? नाना पटोलेंचा कारवाईचा इशारा

आशिष देशमुख ज्या पक्षात गेले त्या पक्षातील त्यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली - नाना पटोले
देशमुखांना भाजपचा प्रचार भोवणार? नाना पटोलेंचा कारवाईचा इशारा
देशमुखांना भाजपचा प्रचार भोवणार? नाना पटोलेंचा कारवाईचा इशारासंजय डाफ
Published On

नागपूर - काँग्रेस Congress मध्ये नुकतीच प्रदेश कार्यकारिणी वर बढती मिळालेले माजी आमदार आशिष देशमुख Ashish Deshmukh हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजप BJP उमेदवाराच्या प्रचार बैठकीत सहभागी झाल्याचा त्यांचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे जिल्हा काँग्रेसमध्ये खदखद होते आहे. भाजप मधून काँग्रेसमध्ये आलेले आशिष देशमुख यांची पुन्हा भाजप मध्ये घरवापसी होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

हे देखील पहा -

आशिष देशमुख हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्य आणि वागणुकीने नेहमीच चर्चेत असतात. आता भाजप उमेदवाराच्या प्रचार बैठकीत सहभाही झाल्यानं ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणूका लागल्या आहेत. या निवडणुकीत उभे असलेले उमेदवार प्रचाराला लागले आहेत. सावरगाव येथील भाजप उमेदवार पर्वता काळबांडे यांच्या प्रचार बैठकीत सहभागी झाले. हे फोटो व्हायरल होत आहेत.

आशिष देशमुख यांना गेल्याच महिन्यात प्रदेश कार्यकारिणीत महासचिव पदी बढती मिळाली. गेल्या आठवड्यात त्यांनी त्यांच्याच पक्षाचे मंत्री सुनील केदार यांच्या विरोधात तक्रारीच पत्र मुख्यमंत्र्यांना लिहलं होतं. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी या प्रकरणाच्या चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे.

देशमुखांना भाजपचा प्रचार भोवणार? नाना पटोलेंचा कारवाईचा इशारा
देशाच्या वायुदल प्रमुखपदी महाराष्ट्राचे विवेक चौधरी

पुढे ते म्हणले की, आशिष देशमुख ज्या पक्षात गेले त्या पक्षातील त्यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली. भाजप मध्ये आमदार झाल्यावर आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर त्यांनी आरोप केले. त्यांनतर आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश घेतला. मात्र, काँग्रेस मध्येही त्यांचं मन रमत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांची भाजप मध्ये घरवापसी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com