Jaydeep Apte News Saam TV
मुंबई/पुणे

Jaydeep Apte News: जयदीप आपटेची टिप पोलिसांना त्याच्या बायकोनेच दिली? वाचा इनसाइड स्टोरी

Jaydeep Apte Latest News: कल्याण रेल्वे स्टेशन व जयदीप आपटे राहत असलेल्या इमारतीच्या परिसरात दोन पथक नेमून सापळा रचला होता. जयदीप आपटे आपल्या इमारतीच्या परिसरात येताच कल्याण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

Ruchika Jadhav

अभिजीत देशमुख, कल्याण|ता. ५ सप्टेंबर २०२४

Jaydeep Apte Arrest Story: मालवण घटनेतील फरार शिल्पकार जयदीप आपटे याला कल्याण पोलिसांनी अटक केले असून त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सिंधुदुर्ग पोलिसांसह कल्याणचे पोलीस देखील जयदीप आपटेच्या शोधात होते. पोलिसांनी जयदीपच्या कुटुंबीयांना विश्वासात घेत चौकशी सुरू केली होती. याप्रकरणात आता एक महत्वाची अपडेट समोर आली असून जयदीप घरी येणार असल्याची टीप त्याच्या पत्नीनेच दिल्याची माहिती समोर आली आहे.

जयदीपच्या पत्नीने जयदीप कल्याणमध्ये येणार असल्याची माहिती दिली होती, मात्र तो कधी व कसा येणार याबाबत काहीच माहिती नव्हती. या माहितीच्या आधारे कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांनी कल्याण रेल्वे स्टेशन व जयदीप आपटे राहत असलेल्या इमारतीच्या परिसरात दोन पथक नेमून सापळा रचला होता. जयदीप आपटे आपल्या इमारतीच्या परिसरात येताच कल्याण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

पत्नीनेच दिली आपटेची टिप

पोलिसांतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयदीप आपटे घरी भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना त्याच्याच पत्नीने दिली. जयदीप आपटे पत्नी नशिगंधा आणि कुटुंबीयांना भेटण्यासाठी येत होता. त्यासंदर्भात त्यानं पत्नीला कळवलं होतं. निशिगंधाने याबाबत पोलिसांना कळवलं होतं. आपटे कुटुंबियांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर जयदीप आपटे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर जयदीप आपटे पसार झाला होता. पोलिसांनी जयदीप आपटे याला शोधण्यासाठी कल्याण-ठाणे शहर पालथे घातले होते. पण त्याचा पत्ता लागत नव्हता.

जयदीप आपटेचे कुटुंबीय त्याला पोलिसांना समर्पण करण्यास सांगत होते. पण जयदीप आपटे याला नकार देत होता. तो दबा धरुन बसला होता. अखेर त्याने कुटुंबियांना भेटायला येण्याचे ठरवले. पत्नीला याबाबत त्याने फोनवर कळवले. पण नवऱ्याच्या काळजीपोटी पत्नीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. जयदीप आपटे येणार असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या.

१५ दिवसांपासून सुरू होता शोध

गेल्या 15 दिवस आपटे यांच्या शोधासाठी पोलिसांनी सगळ्याच संशयित जागांवर पाळत ठेवली होती. त्याचा ठाव ठिकाणा मिळवण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांची देखील चौकशी करण्यात आली होती. अखेर काल आपटे कल्याण पोलिसांच्या जाळ्यात सापडला. या कारवाईबाबत डीसीपी सचिन गुंजाळ यांनी मालवणच्या घटनेतील फरार आरोपी आपटे कल्याणमध्ये राहत असल्याने ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंमरे यांनी आपटे यांना शोधण्याची जबाबदारी दिली होती.

या पार्श्वभूमीवर आपटेला शोधण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली होती. आपटे बाबतच्या संशयित ठिकाणावर पाळत ठेवून होते. काल आपटे हा कल्याणमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या पार्श्वभूमीवर डीसीपी स्कोडच्या पथकासह बाजारपेठ पोलीसांच्या पथकाणे कल्याण स्टेशन परिसराह बाजारपेठ येथील त्याच्या इमारती बाहेर सापळा रचला होता, अशी माहिती कल्याण डीसीपी सचिन गुंजाळ यांनी सांगितली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon News : साप पकडणे बेतले जीवावर; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू

Maharashtra Exit Polls : तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll : शाहूवाडी मतदारसंघात जनसुराज्य शक्तीचा विजय? पाहा Exit Poll

Murtijapur Exit Poll: मुर्तिजापूर मतदारसंघातून कोण निवडून येणार? हरिश पिंपळे की सम्राट डोंगरदिवे? पाहा एक्झिट पोल

Relationship Tips: तुमच्या जोडीदाराला द्या 'या' रंगाचा रत्न, प्रेमात गोडवा वाढेल

SCROLL FOR NEXT