Pune News: पुण्यातील १२० ते १३० जणांवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

Pune Latest News: पुण्यामध्येही रामगिरी महाराजांच्या व वक्तव्याचा निषेध म्हणून आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मुस्लिम समाजाच्या बांधव एकत्र आले होते, तसेच जोरदार घोषणाबाजी केली होती.
Pune News: पुण्यातील १२० ते १३० जणांवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण? जाणून घ्या
Pune Latest News: Saam Tv
Published On

अक्षय बडवे| पुणे, ता. ५ सप्टेंबर २०२४

Ramgiri Maharaj Controversial Statement: सरला बेटचे मंहत रामगिरी महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. रामगिरी महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बेकायदेशीर जमाव जमा केल्याप्रकरणी पुण्यातील १२० ते १३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Pune News: पुण्यातील १२० ते १३० जणांवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण? जाणून घ्या
BJP Candidate List: यादी जाहीर होताच भाजपमध्ये भूकंप! माजी मंत्री, आमदारांसह दिग्गज नेत्यांचे राजीनामे; अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ऑगस्ट महिन्यामध्ये महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लीम धर्मीयांचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर मुस्लीम समाजाच्या नेत्यांनी त्यावर आक्षेप घेऊनही त्यांनी माफी मागण्यास नकार दिला होता. या प्रकरणानंतर राज्यभरातील मुस्लिम बांधवांनी आक्रमक भूमिका घेत रामगिरी गुरुनाथ महाराज यांनी अपशब्द वापरल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी करण्यात आली होती. या वक्तव्यानंतर ठिकठिकाणी निषेध मोर्चेही काढण्यात आले होते.

पुण्यामध्येही रामगिरी महाराजांच्या व वक्तव्याचा निषेध म्हणून आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मुस्लिम समाजाच्या बांधव एकत्र आले होते, तसेच जोरदार घोषणाबाजी केली होती. यासाठी कुठलीही परवानगी पोलिसांनी दिलेली नव्हती. त्यामुळेच परवानगी न घेता संगणनमताने बेकायदेशिर जमाव एकत्र करुन मोठमोठयान घोषणाबाजी करुन धर्म, वंश, भाषा इ. कारणावरुन जातिय तेढ निर्माण होईल अशी कृती केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News: पुण्यातील १२० ते १३० जणांवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण? जाणून घ्या
Maharashtra Politics: राष्ट्रवादीत वादाची ठिणगी! 'एकाच महिलेला किती पदे?' रुपाली पाटील संतापल्या; चाकणकरांना थेट विरोध

धक्कादायक बाब म्हणजे रामगिरी महाराज यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध म्हणून पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वधर्म समभाव महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही ठराविक लोकांनी "सर तन से जुदा" तसेच टिपू सुलतान समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याचाही प्रकार समोर आला होता. याप्रकरणी समाजामध्ये सार्वजनिक शांततेचा भंग होऊन असुरक्षितता व भितीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी ३०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात होता.

Pune News: पुण्यातील १२० ते १३० जणांवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण? जाणून घ्या
19 Metro City Crime Rate : खरंच कोलकाता सुरक्षित शहर आहे का ? ममतांचा दावा खरा की खोटा, NCRB चा अहवाल काय सांगताे?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com