Raj Thackeray Latest News Saam Tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray News : आपल्या लोकांना आणि सरकारला कलाकारांची किंमत नाही; राज ठाकरेंचा निशाणा

Mumbai News : राज ठाकरे रवी परांजपे यांच्या चित्रकृतींच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहिले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राजकारणी तर आहेतच पण त्याचबरोबर ते कलाकरही आहेत. राज ठाकरे हे उत्तम व्यंगचित्रकार आहेत. त्यांची ही कला नेहमीच ते लोकांपर्यंत पोहोचवत असतात. अनेक कलाकारांना प्रोत्साहन देताना राज ठाकरे नेहमी दिसत असतात. नुकतचं त्यांनी रवी परांजपे यांच्या चित्रकृतींच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहिले होते.

चित्रकार रवी परांजपे यांच्या चित्रकृतींच जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाला हजेरी लावली. या प्रदर्शनात रवी परांजपे यांच्या पेटींग्सचे प्रदर्शन करण्यात आले आहे. याचबरोबर रवी परांजपे यांचा १९५८ ते २०२२ असा प्रदीर्घ कलाप्रवास व्यावसायिक बोधचित्र,सरावाची चित्र यांमधून उलगडण्यात आला आहे. (Political News)

कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरेंनी सरकारवर सडकून टीका केली. "मी भाग्यवान आहे की,मी परांजपे सरांकडे शिकलो. आंतरराष्ट्रीय दर्जाच काय काम असतं हे ह्यांची पेटींग्स पाहिल्यावर आपल्याला कळतं.असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार आपल्या देशात असूनही लोकांना आणि अनेक सरकारांना त्याची किंमत नाही". असं म्हणत सरकारवर हल्लाबोल केला.

"हेच रवी परांजपे जर फ्रान्समध्ये किंवा लंडनमध्ये असते तर त्यांची काय किंमत असती. त्यांची कला कशी प्रेझेंट केली असती? याबद्दल आपण विचार न केलेलाच बरा". असं राज ठाकरे म्हणाले. (Latest Marathi News)

"प्रदर्शन कुठे केले पाहिजे ,कशाप्रकारे केले पाहिजे याबद्दल मी बोललो आहे. ज्या कोणाला खरच चित्रकलेचा गंध असेल त्यांनी हे प्रदर्शन आवर्जुन पाहावं. लहान मुलांना त्यांच्या आईवडीलांनी हे प्रदर्शन दाखवावं". असं म्हणत त्यांनी प्रदर्शन पाहण्याच आव्हान केलं.

चित्रप्रदर्शनासाठी आपल्या देशात केंद्राची कमतरता आहे,असे पत्रकारांनी विचारल्यावर राज ठाकरे म्हणाले, "आपल्याकडे जमिनीची कमतरता नाही.फक्त इच्छाशक्तीची कमी आहे. प्रदर्शनासाठी जागा उपलब्ध करुन देणे सरकारसाठी सहज सोपं आहे. यातून कलाकारांना प्रोत्साहन मिळेल आणि असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं काम आपल्याकडेही होऊ शकेल.आपल्याकडेही उत्तम चित्रकार,शिल्पकार आहेत. फक्त त्यांना प्रोत्साहनाची देण्याची गरज आहे. कोणत्याच सरकारला देशातील कलाकारांची किंमत नाही". असे खडेबोल सरकारला सुनावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चतुरस्र अभिनेता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; चित्रपटसृष्टीवर शोककळा, ५ दशकांत ६०० हून अधिक चित्रपटांत केलं होतं काम

Maharashtra News Live Update: Mumbai: रायगडच्या खालापुरमध्ये लागल्या वाहनांच्या रांगा

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

SCROLL FOR NEXT