Raj Thackeray saam Tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray : समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे परंतु...; राज ठाकरेंचा पुन्हा फडणवीस सरकारला इशारा

Raj Thackeray on hindi language row : हिंदी सक्तीचे २ जीआर रद्द करताच राज ठाकरेंनी भलीमोठी पोस्ट केली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी सरकारवर टीकाही केली.

Vishal Gangurde

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीबाबतचे २ जीआर रद्दे केले आहेत. त्रिभाषा सूत्रांसदर्भात सरकारकडून डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे. जीआर रद्द करून फडणवीस सरकारने एक पाऊल मागे घेतले आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर विरोधकांकडून ५ जुलै रोजीचा मोर्चा देखील रद्द करण्यात आला आहे. फडणवीस सरकारच्या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट केली आहे. 'अहवालाचा घोळ घालू नका, अन्यथा या समितीला महाराष्ट्रात काम करू दिलं जाणार नाही याची नोंद सरकारने घ्यावी, अशा शब्दात राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिला आहे.

हिंदी सक्तीबातचे २ जीआर रद्द केल्यानंतरही राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस सरकारला मोठा इशारा दिला आहे. राज ठाकरे यांनी म्हटलं की, 'इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतलाय. सरकारनं या संबंधातील २ जीआर रद्द केलेत. याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही. कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली आहे. हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टाहास का करत होतं. तसेच यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता, हे मात्र अजून गूढच आहे'.

'महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावीच म्हणून तीन भाषा लादण्याचा जो प्रयत्न होता, तो एकदाचा हाणून पाडला गेलाय. यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचं अभिनंदन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एप्रिल २०२५ पासून या विषयावर आवाज उठवला होता आणि तेव्हापासून हा मुद्दा तापायला लागलाय. त्यानंतर एक एक पक्ष आवाज उठवायला लागले, असे राज ठाकरे पुढे म्हणाले.

'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पक्षविरहित मोर्चा काढायच्या ठरवल्यावर अनेक राजकीय पक्षांनी, संघटनांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दाखवली. मोर्चा जर झाला असता तर इतका विशाल झाला असता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण व्हावी. कदाचित या एकजुटीचा धसका सरकारने घेतला असेल, पण हरकत नाही ही भीती असायला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT