Raj Thackeray Uddhav Thackeray Photo Saam tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray Speech: अमित ठाकरेंच्या विरोधात ठाकरे गटाकडून उमेदवार; वरळीतून राज ठाकरेंचं एका वाक्यात प्रत्युत्तर

Raj thackeray Latest News : राज ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या उमेदवारीवरून टीका केली. राज ठाकरेंनी एका वाक्यात प्रत्युत्तर दिलं.

Vishal Gangurde

रुपाली बडवे, साम टीव्ही

मुंबई : विधानसभा निवडणुकसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभांचा धडाका लावला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे देखील माहीममधून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. माहीममध्ये ठाकरे गटानेही उमेदवार रिंगणात उतरवला आहे. पहिल्यांदा आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवली, त्यावेळी मनसेने उमेदवार दिला नव्हता. यावरून राज ठाकरेंनी ठाकरे गटावर निशाणा साधला.

वरळीतील राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे

माझी वरळी कोळीवाड्यात सभा झाली. त्यानंतर जांबोरी मैदानात सभा घ्यायची असं संदिपने सांगितलं. एकाच मतदारसंघात २ सभा घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.

आता काही लोकांची नाटकं बघत आहेत. मला का तपासलं? बॅग तपासली. निवडणूक आयोगाच्या लोकांना कळायला हव होतं की, ज्यांच्या हातातून पैसे सुटत नाहीत ते बॅगेत पैसे ठेवणार का?

माझ्या आता मुलाखती सुरु आहेत. सगळ्यांचा प्रश्न की तुम्ही आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. पण अमित ठाकरे यांच्या त्यांनी उमेदवार दिला. आता हा प्रत्येकाच्या वृत्तीचा भाग आहे.

मला म्हणतात की, भूमिका बदलली. राष्ट्रवादी आणि इतरांनी स्वार्थासाठी जे केलं, त्याला भूमिका बदलणं म्हणतात.

मी नरेंद्र मोदींना समर्थन दिलं. त्यानंतर दिलं नाही. मला जे पटलं, ते मी बोलतो.

काँग्रेसच्या काळातील गोष्टी पुन्हा होऊ लागल्या म्हणून मी विरोध केला. त्या मागे अजूनही गोष्टी आहेत.

२०१९ नंतर काही गोष्टी बदलल्या. काश्मीरमधील ३७० कलम हटवलं. आयोध्येत राम मंदिर बांधलं.

माझा काय स्वार्थ होता. मी कोणतं पद मागितलं का? शरद पवारांच्या बाबतीत तर बोलायला नको. त्यांच संपूर्ण आयुष्य हे भूमिका बदलण्यात गेलं.

मनसे पक्षाने किती भूमिका बदलल्या. इतिहास काढा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT