raj thackeray SAAM TV
मुंबई/पुणे

Raj Thackeray News: कार्यक्रमासाठी संध्याकाळची वेळ असावी, प्रशासनाला कळलं नाही का? राज ठाकरेंचा शिंदे सरकारला परखड सवाल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील उष्माघातामुळे झालेल्या श्रीसदस्यांच्या मृत्यूवरून राज्य सरकारला प्रश्न केले आहेत.

Vishal Gangurde

Raj thackeray News: नवी मुंबईतील खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती दर्शवलेल्या काही श्रीसदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. उष्माघाताने आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे श्रीसदस्यांचा मृत्यू झाल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील उष्माघातामुळे झालेल्या श्रीसदस्यांच्या मृत्यूवरून राज्य सरकारला प्रश्न केले आहेत. (Latest Marathi News)

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विट करत शिंदे सरकारला खडेबोल सुनावले आहेत. 'काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेंव्हा घोषित झाला तेव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

'कधी नव्हे ते मुंबईत (Mumbai) सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का? असा सवाल देखील राज ठाकरे यांनी प्रशासनला केला.

'सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी.ह्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे, असे राज ठाकरे पुढे म्हणाले.

उष्माघातामुळे आतपर्यंत १२ जणांचा मृत्यू

नवी मुंबईतील खारघर (Kharghar) येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला (Maharashtra Bhushan Award ceremony) उपस्थित राहिलेल्या श्रीसदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. या उष्माघाताने काही श्रीसदस्यांचा मृत्यू झाला आहे. उष्माघाताने आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही श्रीसद्यस्यांवर उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

2025 NaraliPurnima : नारळी पौर्णिमेचे दुसरे नाव काय आहे?

Friendship Day 2025 : 'फ्रेंडशिप डे'ला मित्रांसाठी खास बनवा 'मिष्टी दोई', नात्यात वाढेल गोडवा

Marathi Film Awards: महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा; महेश मांजरेकर, मुक्ता बर्वेसह 'या' कलाकारांचा होणार सन्मान

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; भारताने घेतला महत्वाचा निर्णय

Amravati News: ग्रामपंचायत कार्यालय बनला कुस्तीचा आखाडा; सरपंच आणि सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी|VIDEO

SCROLL FOR NEXT