Raj Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

Raj Thackeray News : राज ठाकरे लोकांच्या मनातील मुख्यमंत्री; मनसे नेते अभिजीत पानसे यांचं मोठं वक्तव्य

Political News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसे नेत्यांची बैठक बोलावली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गिरीश कांबळे

Mumbai News :

लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने सर्वच पक्ष कामाला लागले आहे. मनसे देखील अॅक्टिव्ह मोडवर आहे. निवडणुकीआधी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचे अनेक दावेदार देखील समोर येत आहे. त्यात आता राज ठाकरे यांचं देखील नाव समोर आलं आहे. राज ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत, असं वक्तव्य मनसे नेते अभिजीत पानसे यांनी केलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसे नेत्यांची बैठक बोलावली होती. संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेतल्याची माहिती अभिजीत पानसे यांनी दिली. काही दिवसांपूर्वी सर्व नेत्यांना लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याची जबाबदारी दिली होती, याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.  (Latest News Update)

अभिजीत पानसे यांनी म्हटलं की, राजसाहेब मनसे नेत्यांची बैठक घेत असतात. संपूर्ण महाराष्ट्रचा आढावा घेण्यासाठी ही बैठक होती. कोकणचा रस्ता असो, मराठी माणसाचं घरं खाली करणं असो, या सर्व मुद्द्यांसाठी राज साहेब पुढे राहिले आहेत. (Politics News)

मुंबईत मराठी माणूस हरवून गेला आहे. मराठी पाट्यांच्या विषय राज साहेबांनी मांडला. मनसेने आंदोलने केली आणि संपूर्ण आढावा घेऊन आम्ही आता पुढे येत आहोत. अनेक लोकं बोलली मनसेच्या बाजूने वातावरण आहे. राज साहेब लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहेत आणि त्यासाठी आम्ही काम करायला लागलो आहोत, असं अभिजीत पानसे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: २ महिन्यांपूर्वी लग्न, दिवाळीनिमित्त घरी आले; घरात आढळले शिक्षक दाम्पत्याचे मृतदेह

Kitchen Safety Tips: किचनमध्ये गॅस सिलिंडर फ्रिजच्या जवळ का ठेवू नये? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: गोकुळ दूधसंघाच्या प्रकरणात सतेज पाटील यांना न्यायालयाकडून न्यायची अपेक्षा

EPFO Update : मोठी बातमी! EPF खात्यातील चुकीचं नाव किंवा जन्मतारीख घरबसल्या बदला; फक्त ५ सोप्या स्टेप्स

Palak Paneer Recipe: सणासुदीला घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी चविष्ट पालक पनीर, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT