Political News : शिवसेना ठाकरे गटाला घेरण्याची भाजपची रणनिती; दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी आक्रमक

Mumbai Political News : दक्षिण मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे अरविंत सावंत खासदार आहेत.
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray
Devendra Fadnavis on Uddhav ThackeraySaam Tv

सूरज मसूरकर

Mumbai News :

भाजपने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला सुरुवात केली आहे. मुंबईत ताकद वाढवण्यासाठी भाजपकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी भाजप आक्रमक झाला आहे. याठिकाणी शिवसेना ठाकरे गटाला घेरण्यासाठी भाजपने रणनिती आखली आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यावर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी भाजपने दिल्याची माहिती आहे. दक्षिण मुंबई भाजप पदाधिकारी बैठकीत या सूचना दिल्याची माहिती आहे. दक्षिण मुंबईत सध्या शिवसेना ठाकरे गटाचे अरविंत सावंत खासदार आहेत. (Latest News Update)

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray
Political News : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये त्या रात्री काय चर्चा झाली? सूत्रांच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती आली समोर

भाजपच्या ताब्यात नसलेल्या दक्षिण मुंबईतील चार विधानसभांवर देखील भाजपचं लक्ष आहे. वरळी, शिवडी, भायखळा व मुंबादेवी येथे विशेष लक्ष देण्याच्या सूचना या बैठकीत दिल्याची माहिती आहे.

सध्या वरळीत आदित्य ठाकरे, शिवडीमध्ये ठाकरे गटाचे अजय चौधरी, भायखळा येथे शिंदे गटाच्या यामिनी जाधव आणि मुंबादेवी येथे काँग्रेसचे अमिन आमीरअली पटेल आमदार आहेत. (Politics News)

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray
Wagh Nakh Coming to India : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे शिवप्रेमींना कधी आणि कुठे पाहता येतील?

यातील वरळी आणि शिवडी विधानसभा मतदारसंघावर भाजपचं विशेष लक्ष आहे. दक्षिण मुंबईत सध्या भाजपचे दोन आमदार आहेत. या ठिकाणी आणखी दोन विधानसभा व १२ नगरसेवक निवडून आणण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. विकासकामे मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याच्याही सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com