Vasant More- Raj Thackeray
Vasant More- Raj Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

वसंत मोरेंकडून महाआरतीचे आयोजन; राज ठाकरेंसह मनसैनिकांची दांडी!

गोपाल मोटघरे

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात आहेत. माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी पुण्यातील कात्रजमध्ये आज महाआरतीचे आयोजन केले होते. राज ठाकरे याठिकाणी उपस्थीत राहणार का? असा प्रश्न होता. परंतु राज ठाकरे आणि पुणे शहरातील इतर मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गैरहजर आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते.

राज्याच्या राजकारणात भोंग्याचा मुद्दा सध्या धुमाकूळ घालताना दिसतोय. राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेसह त्यानंतर घेतलेल्या दोन्ही सभेत हाच मुद्दा रेटून धरल्याचे पाहावयास मिळत आहे. मुस्लिम समाजाशी निगडित असलेल्या या मुद्द्याला हात घातल्यानंतर मनसेमध्ये सक्रिय असणारे अनेक मुस्लिम पदाधिकारी पक्षास जय महाराष्ट्र करत पक्षातून बाहेर पडले.

राज ठाकरेंनी ३ मे पर्यंत भोंगे हटवण्याचा अल्टिमेटम राज्यातील सर्व मशिदीच्या मौलवींना तसेच राज्यसरकारला दिला होता. दरम्यान, भोंगे हटवले गेले नाहीत तर मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा असे आदेश राज ठाकरे यांनी त्यांच्या सर्व मनसैनिकांना दिले होते. राज ठाकरेंची हीच भूमिका प्रत्यक्षपणे मुस्लिम समाजाविरोधात असल्याने पक्षाच्या या भूमिकेस आपले समर्थन नसल्याची भूमिका पुण्यातील मनसेचे नेते माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी घेतली. तसेच मला आपल्या प्रभागात शांतता हवी असल्याचेही मोरे यांनी सोशल मीडियाद्वारे स्पष्ट केले होते. पक्षाच्या भूमिकेस डावलल्याने वसंत मोरेंचे पुणे शहराध्यक्ष पद काढून टाकण्यात आले. यानंतर मोरेंसह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता.

वसंत मोरे नाराज असून पक्षास सोडचिट्ठी देणार अश्या चर्चांना उधाण आले होते. या सगळ्या घडामोडी घडत असतानाच राज ठाकरेंनी वसंत मोरेंना कृष्णकुंज निवासस्थानी बोलावून समजूत काढली व ठाण्यातील 'उत्तर सभेसाठी' निमंत्रण दिले व या सभेत त्यांना बोलण्याची संधीही दिली. याही सभेत राज ठाकरेंनी तोच भोंग्यांचा मुद्दाच समोर घेऊन महाविकास आघाडीमधल्या नेत्यांवर जोरदार शरसंधान केले. दरम्यान, या उत्तर सभेनंतर पुण्यात मनसेकडून हनुमान जयंतीदिवशी खालकर चौकातल्या मारुती मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते महापूजेचे आयोजन करण्यात आले.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : अखेर आरटीई प्रवेश प्रक्रियेला मिळाला मुहूर्त, नियम बदलाला उच्च न्यायालयाने दिली होती स्थगिती

Hina Khan Post : पीरियड्स आले असताना हिना खानने ४० डिग्री सेल्सियसमध्ये केलं काम; नंतर म्हणाली...

Weightloss Foods: वजन कमी करण्यासाठी 'हा' पदार्थ करा ट्राय

T20 World Cup: T-20 वर्ल्डकप तोंडावर असताना या ५ कारणांमुळे वाढलं टीम इंडियाचं टेन्शन

Pune Accident: पुण्यात कंटेनर- दुचाकीचा भीषण अपघात, पोटावरून चाक गेल्याने एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT