Pune Accident: पुण्यात कंटेनर- दुचाकीचा भीषण अपघात, चाकाखाली चिरडून एकाचा मृत्यू

Pune Two Wheeler And Container Accident: पुण्यातील कात्रज बायपासकडून देहूरोडच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर आणि दुचाकीला अपघात झाला. सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामध्ये सोलापूरच्या संतोष दिलीप तिखट यांचा मृत्यू झाला.
Pune Two Wheeler And Container Accident
Pune Two Wheeler And Container AccidentSaam Tv

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये भीषण अपघाताची (Pune Accident) घटना समोर आली आहे. पुण्यामध्ये कंटेनर आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. पुण्याच्या कात्रज परिसरात सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

मिळाल्या माहितीनुसार, पुण्यातील कात्रज बायपासकडून देहूरोडच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर आणि दुचाकीला अपघात झाला. सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामध्ये सोलापूरच्या संतोष दिलीप तिखट यांचा मृत्यू झाला. कंटेनरने धडक दिल्यामुळे संतोष दुचाकीसह रस्त्यावर पडले. कंटनेरच्या पुढील चाकाखाली आल्यामुळे संतोष यांच्या पोटावरून चाक गेले आणि ते गंभीर जखमी झाले.

Pune Two Wheeler And Container Accident
Pune News: पुण्यातील ट्रेनिंग सेंटरमध्ये २७ वर्षीय तरुणीचा विनयभंग; आरोपीविरोधात गुन्हा, संतापजनक घटना

या अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या संतोष यांना पोलिसांनी तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी नेले. पण रुग्णालयामध्ये पोहचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. भारती विद्यापीठ पोलिसांनी संतोष यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयामध्ये पाठवला असून त्यांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली.

Pune Two Wheeler And Container Accident
Pune News: पुण्यात चोरट्यांचे चक्क पोलिसांनाच चॅलेंज; पोलीस आयुक्तालयासमोरूनच पोलिसांची वाहने चोरली

याप्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे. विठ्ठल बाबासाहेब गीते (२६ वर्षे) असं या चालकाचे नाव असून तो बीडच्या आष्टी येथे राहतो. पोलिसांकडून कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या अपघातामुळे कात्रज बायपासजवळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दुचाकी आणि कंटेनर हटवल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळी केली.

Pune Two Wheeler And Container Accident
Pune Crime: कुख्यात गुन्हेगार हिरव्या, डड्याचा राडा; घरात घुसून एका कुटुंबाला दिली जिवे मारण्याची धमकी

दुसरीकडे, पिंपरी चिंचवड शहरातील एम्पायर इस्टेट परिसरात डंपरच्या मागच्या चाकाखाली चिरडून एका २७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सायंकाळी ४ च्या सुमारास रस्त्यावरुन विरूद्ध दिशेने दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. योगेश श्रीकांत संगनोर असं मृत तरुणाचे नाव आहे. तो मूळचा नांदेडचा असून पिंपरी चिंचवड शहरामध्ये काम करत होता. घटनास्थळी पिंपरी पोलीसांनी घाव घेत योगेशचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.

Pune Two Wheeler And Container Accident
Amravati News: गर्दी कमी करा असं सांगितलं म्हणून डॉक्टरला मारहाण, तिघांना अटक, घटना CCTV मध्ये कैद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com