Pune News: पुण्यात चोरट्यांचे चक्क पोलिसांनाच चॅलेंज; पोलीस आयुक्तालयासमोरूनच पोलिसांची वाहने चोरली

Pune Police News : आता तर या चोरट्यांनी चक्क पोलिसांनाच आव्हान दिलं आहे. पुणे पोलीस आयुक्तालयासमोरील पार्किंगमध्ये उभी असलेली वाहने चोरट्यांनी लंपास केली आहे.
Pune Police News
Pune Police NewsSaam TV

अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे

मागील काही दिवसांपासून पुणे शहरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. शहरात सातत्याने वाहनचोरीचे प्रकार घडत आहेत. आता तर या चोरट्यांनी चक्क पोलिसांनाच आव्हान दिलं आहे. पुणे पोलीस आयुक्तालयासमोरील पार्किंगमध्ये उभी असलेली वाहने चोरट्यांनी लंपास केली आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.

Pune Police News
Eknath Shinde : मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरताच बॅगांची झाडाझडती

विशेष बाब म्हणजे, चोरी गेलेल्या वाहनांमध्ये पोलिसांच्या तीन दुचाक्यांचा समावेश आहे. त्यामुळे वाहन चोरांना आता पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नुकतीच पुणे लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या कालावधीत पोलीस प्रशासन बंदोबस्तात गुंतले होते. याच गोष्टीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी पोलीस आयुक्तालयासमोरील पार्किंगमध्ये उभी असलेली वाहने चोरून नेली.

यातील एक दुचाकी एका अज्ञात स्थळी सापडल्याचं कळतंय. आतापर्यंत याप्रकरणी कोणताही गुन्हा नोंद करण्यात आला नसल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार, पुणे शहरात अवघ्या अडीच महिन्याच्या काळात चोरट्यांनी तब्बल ४०० वाहने चोरी केली आहेत.

या वाहनांची किंमत जवळपास दीड कोटींच्या घरात आहे. यामध्ये दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे पुणे शहरात सीसीटीव्हीचे जाळे असूनही हे चोरटे पोलिसांना सापडत नाहीये.

तसेच चोरीला गेलेल्या वाहनांचा देखील कुठलाही थागपत्ता लाग नाहीये. पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरटे वाहने चोरत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आता या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पुणे पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

Pune Police News
Pune News: पुण्यातील ट्रेनिंग सेंटरमध्ये २७ वर्षीय तरुणीचा विनयभंग; आरोपीविरोधात गुन्हा, संतापजनक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com