Raj Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

Raj Thackeray in Dombivli: राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र; ठिकठिकाणी 'मनसे कट्टा' बांधण्याचे आदेश

Raj Thackeray in Dombivli: आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजीत देशमुख

Kalyan News : मनसे प्रमुख राज ठाकरे हे कल्याण डोंबिवलीच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर होते. रविवारी ठाकरे यांनी कल्याणमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून काही सूचना केल्या.

त्यानंतर राज ठाकरे आज डोंबिवलीत दाखल झाले. डोंबिवलीतील सर्वेश हॉलमध्ये मनसे आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर काही जणांनी मनसेत प्रवेश केला.  (Latest Political News)

राज ठाकरे यांनी बैठकीदरम्यान काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत. राज ठाकरे यांनी डोंबिवलीत झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान संघटनात्मक बांधनीसाठी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला. (Latest Marathi News)

राज ठाकरे यांनी लोकांशी संपर्क वाढवा, ठिकठिकाणी 'मनसे कट्टा' बांधा, लोक शाखेत येऊन व्यक्त होत नाहीत, कट्ट्यावर व्यक्त होतात. लोकांचं पक्षाबद्दल आणि तुमच्या कामाबद्दल काय मत आहे, जाणून घ्या. या पार्श्वभूमीवर येत्या जून महिन्यात मनसे कट्ट्याबाबत डोंबिवलीत मनसे नेत्यांची मोठी कार्यशाळा घेण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nepal Prime Minister K.P. Sharma Oli resigns : नेपाळमध्ये सत्तापालट; पंतप्रधान ओलींचा राजीनामा

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूरात राज्यस्तरीय एकदिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन

RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; ऑफिसर पदासाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Koli Community : कोळी समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करा; महादेव, मल्हार कोळी समाज आक्रमक

गोकुळचा मोठा निर्णय! लवकरच चीज अन् आईस्क्रीम बाजारात आणणार; शेतकऱ्यांनाही दिलासा

SCROLL FOR NEXT