Karnataka Next CM: कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री निवडीसाठी काँग्रेसकडून 3 फॉर्म्युल्यांचा विचार; डीके शिवकुमार यांचं काय होणार?

Karnataka Next CM: तिन्ही फॉर्मु्ल्यांवर नजर टाकली तरी डीके शिवकुमार यांचं पारडं जड दिसत आहे.
Who will be Karnataka CM
Who will be Karnataka CMSaam TV

Karnataka Next CM: कर्नाटकात काँग्रेसने मॅजिक फिगर गाठत सत्ता काबिज केली. पण आता कर्नाटकातील पुढील मुख्यमंत्री कोण असणार असा मोठा पेच काँग्रेस पक्षश्रेष्ठींसमोर आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या हे पुढे आहेत.

नवनिर्वाचित काँग्रेस आमदारांनी एकमताने अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना मुख्यमंत्री निवडीचे अधिकार दिले आहेत. यानंतर आता मुख्यमंत्री निवडीसाठी 3 फॉर्म्युले जोरदार चर्चेत आहेत. तिन्ही फॉर्मु्ल्यांवर नजर टाकली तरी डीके शिवकुमार यांचं पारडं जड दिसत आहे.

Who will be Karnataka CM
Maharashtra Politics: ठाकरे गटाचे आमदार आज विधानसभा सचिवांना भेटणार, अपात्रतेबाबत निर्णय घेण्यासाठी देणार पत्र

प्रदेशाध्यक्षाची मुख्यमंत्रिपदी वर्णी

विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून प्रदेशाध्यक्षाची निवड या फॉर्म्युल्याची काँग्रेसमध्ये सर्वाधिक चर्चा होत आहे. 2015 नंतर काँग्रेसला 5 राज्यांमध्ये स्वबळावर सरकार स्थापन करता आले. यामध्ये पंजाब (2017), मध्य प्रदेश (2018), छत्तीसगड (2018), राजस्थान (2018) आणि हिमाचल (2022) यांचा समावेश आहे. 5 पैकी 3 राज्यांमध्ये विधीमंडळ पक्षाचा नेता म्हणजेच मुख्यमंत्री म्हणून प्रदेशाध्यक्ष निवडला गेला.

महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना काँग्रेसच्या वतीने विधिमंडळ पक्षनेते करण्यात आले होते. 2013 मध्ये विजयी झाल्यानंतर तत्कालीन अध्यक्ष सिद्धरामय्या यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बनवण्यात आले होते. 2012 मध्ये हिमाचलमध्ये प्रदेशाध्यक्ष वीरभद्र सिंग यांना मुख्यमंत्री बनवले होते. या सूत्राच्या अंमलबजावणीची काँग्रेसमध्ये सर्वाधिक चर्चा आहे. यानुसार डीके शिवकुमार यांचं पारडं जड आहे. (Latest Political News)

Who will be Karnataka CM
कर्नाटकातील पराभवानंतर BJP सावध! सर्व खासदारांना 30 मे ते 30 जूनदरम्यान मतदारसंघातच राहण्याच्या सूचना

पंजाब-हिमाचल प्रदेशचा फॉर्म्युला

2021 मध्ये जेव्हा कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी हायकमांडवर नाराज होऊन मुख्यमंत्रीपद सोडले, त्यानंतर अनेक नावांची चर्चा झाली. त्यात सिद्धू आणि सुनील जाखड यांची नावं ठळक होती, पण शेवटी चरणजित सिंग चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.

हिमाचलमध्येही 2022 मध्ये विजयानंतर प्रतिभा सिंह, मुकेश अग्निहोत्री आणि सुखविंदर सिंग सुखू यांच्या नावाची चर्चा होती, मात्र अखेर हायकमांडने सुखू यांच्या नावाला मंजुरी दिली. कर्नाटकातही मुख्यमंत्री निवडीमध्ये राहुल यांच्या पसंतीला प्राधान्य दिले जाऊ शकते. येथेही डीके शिवकुमार यांचाच वरचष्मा असल्याचे मानले जात आहे.

Who will be Karnataka CM
Mallikarjun Kharge News : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना कोर्टाचे समन्स; 100 कोटींच्या...

सत्तावाटपाचे समान सूत्र

राजस्थानप्रमाणे कर्नाटकातही सत्तावाटपाचे सूत्र लागू करण्याची चर्चा आहे. सिद्धरामय्या आणि शिवकुमार हे दोघेही आपल्या बाजूने ६५ हून अधिक आमदार असल्याचा दावा करत आहेत. सिद्धरामय्या हे मुख्यमंत्रीही राहिले आहेत. अशा स्थितीत हायकमांडही त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. राजस्थानप्रमाणे येथेही एकाला मुख्यमंत्रिपद तर दुसऱ्याला उपमुख्यमंत्रीपद मिळू शकते. हा फॉर्म्युला लागू झाल्यास सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com