राज्यात औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रातील अनेक पक्षाकडून औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली जात आहे. भाजप आणि शिंदे गटाने कबर हटवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. कबरीच्या मुद्द्यावरून नागपुरात हिंसाचारही उफाळला. याच कबरीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली. मुलभूत प्रश्न सोडून औरंगजेबाच्या कबरीवर चर्चा सुरु आहे. मराठ्यांना संपवायला निघालेल्याला औरंगजेबाला इथे गाडलाय, असं राज ठाकरेंनी म्हटलं.
आपण औरंगजेबाची कबर तोडली पाहिजे का राखली पाहिजे या चर्चेत अकडलोय. आता कुठून औरंगजेब आठवला? चित्रपट पाहिल्यावर यांना हिंदुत्व आठवलं? चित्रपट पाहिल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य आठवतं? हल्ली कुणीही विधानसभेत इतिहासावर बोलतात. औरंगजेब प्रकरण माहिती तरी आहे का? औरंगजेबाचा जन्म गुजरातमधील दाहोदमधला आहे. यावरून ब्राह्मण, मराठा आणि इतर जातीत भांडणे लावायची.
तुम्हाला फक्त तुमची माथी भडकवायची आहेत. छत्रपती संभाजी महाराजांशी घेणं देणं नाहीत. हिंद प्रांतात एक कडवट, प्रभावी ज्यांना स्वप्न पडलं त्या जिजाऊ साहेब आहेत. हे त्यांचं स्वप्न आहे, त्यांना कळायचं नाही की आमचीच लोकं त्यांच्याकडे का चाकरी करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हिंद प्रांतावर केलेला संस्कार असून एक चमत्कार आहे, तो एक विचार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जन्माला यायच्या आधी हिंद प्रांताची काय स्थिती होती? शहाजी राजेही आदिलशाहीत होते. मग ते पुढे निजामशाहीत गेले. छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा या सर्वांच्या विरोधात होता. त्या छत्रपती शिवरायांना जातीत का पाहता? अफजल खानाचा वकील ब्राह्मण होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वतीने त्याच्याशी बोलायला गेलेला पण ब्राह्मणच होता. त्यावेळेस काय निर्णय घेतले असतील, काय माहिती? आग्र्याच्या दरबारात छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाची पाच हजारी मनसबदारी घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या परवानगीशिवाय घेतली असेल काय? त्या परिस्थितीत जे करणं आवश्यक होतं, ते महाराजांनी केलंय.
मिर्जाराजे जयसिंग, उदयभान राठोड यांच्याशी जो संघर्ष झाला ते कोण हिंदूच होते ना? औरंगजेबाचा विषय निघाल्याने सांगतो. त्याचं राज्य अफगाणिस्तान ते दक्षिणेपर्यंत आणि इकडे बंगालपर्यंत होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यावर औरंजेबाच्या एका मुलाला आसरा छत्रपती संभाजी महाराजांनी दिलाय.
१६८१ ते १७०७ औरंजेब महाराष्ट्रात लढत होता. आमच्या संभाजी राजांसोबत लढला. छत्रपती संभाजी महाराजांना क्रूर पद्धतीने मारलंय. राजाराम महाराज, संताजी धनाजी लढले. नरहर कुरुन्दकरांच्या पुस्तकात एक छान वाक्य आहे, मराठे सर्व लढाया हरत होते, पण औरंगजेब एकही लढाई जिंकला नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.