Raj Thackeray Latest News Saam Tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray Speech : सूरत-गुवाहाटी, पहाटेचा शपथविधी, शिवसेना; राज ठाकरेंची एकाच सभेत ठाकरे, पवार, शिंदे, फडणवीसांवर तोफ

Raj Thackeray Speech in vikroli : राज ठाकरेंनी विक्रोळीत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेतला .

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात सभांचा धडाका लावला आहे. राज ठाकरेंनी विक्रोळीतील प्रचारसभेत महायुतीसह महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यासहित उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.

राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे

त्यांना वाटतं आमच्याकडे तोंड नाही.आमचं तोंड सुटलं ना.. तर त्यांना कल्पना नाही. आम्ही संयम बाळगतो, याचा अर्थ x*&# समजू नये.

राजकारणाचे व्याकरण बदलून टाकले. काय कशाचा कुठे पत्ता नाही. पाच वर्षात काय काय झालं आठवून पहा. आपण दिलेले मत कुठे फिरत आहे काही कळतय का?

महाराष्ट्राच्या झालेल्या अपमानाचा बदला या २० तारखेला घ्यायचा आहे. तुम्ही शांत आणि गप्प बसता ना म्हणून अशा गोष्टी घडतात. राजकारणात निवडणुका झाल्या, फडणवीसांचा सकाळचा शपथविधी झाला. त्यानंतर पुढे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. ज्यांच्याविरोधात निवडणुका लढवल्या आणि हे इकडे बसले आणि मुख्यमंत्री झाले.

तुमच्या मतांशी प्रतारणा करून अपमान करून एक पक्ष जो भाजपसोबत निवडणूक लढला, ज्यांच्या विरोधात इतकी वर्षे लढला त्या काँग्रेसबरोबर जाऊन मुख्यमंत्रिपद घेतलं.

अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना लक्षात आले नाही की ४० नेते गेले. मुख्यमंत्र्यांचं सकाळचं पोलिसांचं रिपोर्टींग असतं. यांनी कधी घेतलं नाही. कुठे पोहोचले एके दिवशी कळलं. गुवाहाटीला पोहोचले. हे तिथे गेले.

भाजपसोबत शिंदे गेले. शिंदेंना विचारलं. तुम्ही भाजपसोबत ४० जणांसोबत का गेलात. त्या ठिकाणी अजित पवार बसले असतील, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही. स्वाभिमान.. मग भाजपचा संसार सुरू झाला. अचानक शिंदेंच्या लक्षात आले की यांनी डोळा मारला. ज्यांचायसाठी बाहेर पडले, ते अजित पवार मांडीवरच बसले. आता झाली पंचाईत..

महाराष्ट्रात काय चाललंय. विचारधारा नाही. काय शब्द दिलेत. काय वचने दिलीत. कशाचा कसाला पत्ता उरला नाही. सगळे आपापले खेळ खेळतात. आपण लाचारासारखे यांना मते देता. तुम्हाला गृहीत धरतात. पाच वर्षे यांना तुमच्याकडे बघायचे नाही. राजकीय स्वार्थासाठी वाटेल त्या गोष्टी करणार. मतांचा अपमान करणार आहोत.

तुमचा काही संबंध नाही. पुन्हा निवडणूक येतील तेव्हा बघू..पैसे तोंडावर फेकतील. आम्हालाच मतदान करतील, असा त्यांना विश्वास आहे. त्यांचा विश्वास मोडाल, तेव्हा हे लोक वठणीवर येतील. २०२४ निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. यांनी जे केलं ते बरोबर की चुकीचं केले हे तुम्ही ठरवणार आहात. या निवडणुकीत तुम्ही त्यांना शिक्का माराल तेव्हा चांगले दिवस येतील, याची अपेक्षा ठेवू नका. काही होणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA 1st T20I: नाद करा पण आमचा कुठं! वर्ल्ड चॅम्पियन भारताचा दक्षिण आफ्रिकेला दणका

Supriya Sule Speech : पोर्शे कार अपघात प्रकरणात बदनामी केल्यामुळे शरद पवारांना नोटीस; सुप्रिया सुळेंचा भरसभेत गौप्यस्फोट

6,6,6,6,6...द.आफ्रिकेत Sanju Samsonचं वादळ! असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच भारतीय फलंदाज

IND vs SA 1st T20I: दक्षिण आफ्रिकेत संजू सॅमसन शो.. दमदार अर्धशतकासह मोडला मोठा रेकॉर्ड

Champions Trophy 2025: टीम इंडियाचा पाकिस्तानात जाण्यास नकार! या देशात होणार सामने

SCROLL FOR NEXT