Marathi Language Victory Rally  Saam Tv News
मुंबई/पुणे

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Marathi Language Victory Rally : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले खरे... मात्र या युतीची साखरपेरणी कधीपासून सुरु झाली होती? आणि त्यात कोणते अडथळे आले? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Prashant Patil

भरत मोहोळकर, साम टिव्ही

मुंबई : अखेर २० वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले... मात्र हे एकाच दिवसात घडलं नाही... तर त्याच्या पेरणीची सुरवात १९ एप्रिलला झाली होती.. महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली आणि मुलाखतीत त्यांनी उद्धव ठाकरेंना घातलेली साद महत्वाची ठरली. राज ठाकरेंच्या या सादेला महाराष्ट्रापुढे आमच्यातील वाद क्षुल्लक आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनीही प्रतिसाद दिला. आता ठाकरेंची युती होणारच अशी जाहीर चर्चा सुरू झाली असतानाच दोन्ही बंधू परदेश दौऱ्यावर गेले.. तर राज ठाकरेंच्या परदेश दौऱ्यानंतर पुढाकार कोण घेणार यावरून युतीची चर्चा बारगळली होती... मात्र याच काळात ठाकरे गट युतीबाबत आशावादी असल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलं होतं.. ठाकरे गट युतीसाठी सकारात्मक असल्याचं समोर आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी राज ठाकरेंसोबत भेटीगाठींचा सिलसिला सुरु केला...

मराठी भाषेचं कारण देत उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीला

एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या घरी स्नेहभोजनास हजर

उदय सामंत पुन्हा राज ठाकरेंच्या भेटीला

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची वांद्र्यातील ताज लँड्स एण्ड हॉटेलमध्ये गुप्तगू

महायुतीतील नेत्यांच्या भेटीनंतर ठाकरे बंधूंच्या युतीला ब्रेक लागल्याची चर्चा होती. मात्र उद्धव ठाकरेंनी युतीबाबत स्पष्ट संकेत दिले होते. राज ठाकरेंनी 2005 मध्ये शिवसेना सोडल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनीही दोन्ही भावांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र ठाकरे बंधू एकत्र आलेच नाहीत. मात्र एका हिंदीसक्तीच्या निर्णयाने दोन्ही भावांना एकत्र आणल्याची कबुली राज ठाकरेंनी दिलीय.

आता दोन्ही भाऊ हिंदीसक्तीविरोधात एकत्र आले. त्यांचं मनोमिलनही झालंय. एवढंच नाही तर आगामी काळातही एकत्र राहण्याचं जाहीर केलंय. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. त्यामुळे ठाकरेंनी एकीच बळ कायम ठेवल्यास त्यांची युती होऊ नये म्हणून प्रयत्न करणाऱ्या महायुतीचं टेन्शन वाढणार हे मात्र निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

SCROLL FOR NEXT