Raj Thackeray And Uddhav Thackeray  Saam Tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray: मोठी बातमी! २६ जुलै रोजी ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा

Raj Thackeray And Uddhav Thackeray Press Conferance: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये त्यांनी २६ जुलै रोजीच्या मोर्चाची घोषणा केली.

Priya More
  • ठाकरे बंधूंची मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद

  • २६ जुलैच्या मुंबईत मोर्चाची घोषणा

  • दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीचार्जच्या निषेधार्थ काढणार मोर्चा

  • राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका करत विद्यार्थ्यांच्या समर्थनाची भूमिका मांडली

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीमार प्रकरणाचा ठाकरे बंधूंनी निषेध केला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू आक्रमक झाले आहेत. आज मुंबईत उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेतून राज ठाकरे यांनी मोदी सरकारला खडेबोल सुनावले. यावेळी त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा केली. येत्या २६ जुलै रोजी विद्यार्थ्यांसह हा मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली.

राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 'संपूर्ण आंदोलन शांतते सुरू होते. केंद्राकडून मुलांना मारले जाते. दबाव टाकला जात आहे. त्याचे पडसाद देशात, महाराष्ट्रात मुंबईत उमटत आहेत. भाजप जेव्हा विरोधात होता तेव्हा त्यांनी अनेकांचे राजीनामे मागवले होते. पटनाईकांचा राजीनामा मागितला होता त्यानंतर त्यांना पदावरून काढले होते. एका वाक्यावरून आर आर पाटील यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मुलांचीही ही राजीनाम्याची मागणी होती.'

नीट परीक्षेला आमचा विरोध होता असे म्हणच राज ठाकरे म्हणाले की, 'नीट परिक्षेला आम्ही तेव्हाच विरोध केला. सत्ताच इतकी होती की ऐकायची तयारी नव्हती. आजही तसेच आहे. आज धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागितला होता. पण आता धर्मेंद्र प्रधानांपुरता विषय राहिला नाही. पंतप्रधानांपर्यंत गेला आहे. पीएमने आज एक ट्वीट केलेय. पण त्याचा आता काहीच फरक पडत नाही. हे सर्व कशासाठी आहे. हीच गोष्टी आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन झाले तेही चिरडण्याचा प्रय तेव्हाही कुणाला भेटायचं तयार नव्हते. मणिपूरलाही तसेच झाले. ग्रामीण भागातही आंदोलन होतात पण त्यांचे लक्ष नाही.'

सरकारला सत्तेचा माज आला असल्याचा आरोप करत राज ठाकरे म्हणाले की, 'हा कुठला सत्तेचा माज. ते काही वेगळे मागत आहे. नीटची परीक्षा द्यायला किती मेहनत घ्यावी लागते ते त्यांना विचारा. आधी शेतकरी आत्महत्या करत होते, आता विद्यार्थी आत्महत्या करतात. विद्यार्थ्यांबरोबर इतरही आंदोलनात आले आहे. हा सिस्टिमविरोधात राग आहे. जी मुलं आज मोठ्या आपेक्षाने आली त्याचा पुढे काय करायचं त्यांना कशी वाट करून द्यायची याचच विचार करत होते. '

या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी मुंबईत शक्तीप्रदर्शन करणार असल्याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, '२६ तारखेला आम्ही एक मोर्चा मुलांना घेऊन करायचं ठरवले आहे. मुंबईत पालक आणि मुलं एकत्र येऊन आपला राग- रोष व्यक्त करत आहेत. आम्ही मोर्चा काढत आहे.शिवाजी पार्क येथील शिवतीर्थवरून हा मोर्चा निघेल आणि सिद्धीविनायक मंदिरापर्यंत जाईल. सिद्धिविनायकाला जाऊन आम्ही साकडे घालणार आहोत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Fort : १५ ऑगस्टला फिरण्याचा प्लान करताय? देशभक्तीची भावना जागवणाऱ्या 'या' ऐतिहासिक स्थळांना नक्की भेट द्या

Maharashtra News Live Update : आंबोली-चौकुळच्या सड्यावर कोल्ह्यांच्या कळपाचा मुक्त खेळ

Fitness Tips: जिमला जाण्याची गरज नाही! फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी ‘या’ ७ सवयी लावा

Mumbai Police: ड्रग्ज खरेदी करताना पोलिसाला अटक, मुंबई पोलिस दलात खळबळ

Independence Day Marathi Speech : १५ ऑगस्टला भाषण देताय? हे 10 मुद्दे लक्षात ठेवा; भाषण ऐकून सर्वच करतील कौतुक!

SCROLL FOR NEXT