Raj Kundra Pornography Case Updates Saam Tv
मुंबई/पुणे

Raj Kundra Case: कास्टिंग डायरेक्टरसह चौघांना अटक, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई

राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी मोठी कारवाई करत आणखी 4 जणांना अटक केलीये.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी मोठी कारवाई करत आणखी 4 जणांना अटक केलीये. मुंबईतील वर्सोवा आणि बोरिवली परिसरातून गुन्हे शाखेच्या पथकाने या 4 जणांना अटक केली आहे. यापैकी एका कास्टिंग डायरेक्टरचाही राजच्या कंपनीशी संबंध असल्याची माहिती पुढे येत आहे (Raj Kundra pornography case Updates).

या प्रकरणात राज कुंद्राला (Raj Kundra pornography case) 20 सप्टेंबर 2021 ला जामीन मिळाला होता. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज कुंद्रा आणि त्याचा साथीदार रायन थॉर्प यांच्याविरुद्ध 1500 पानांची चार्टशीट न्यायालयात दाखल केली होती आणि ते दोघेही या पॉर्नोग्राफी रॅकेटचे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

पॉर्नोग्राफी फिल्म रॅकेट प्रकरणात राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai Police Crime Branch) 19 जुलै 2021 ला अटक केली होती. तत्पूर्वी त्याची चौकशी करण्यात आली होती. राजचा आयटी सहकारी रायन थॉर्प यालाही दुसऱ्या दिवशी (21 जुलै 2021) अटक करण्यात आली होती. राजच्या अटकेनंतर काही व्हॉट्सअॅप चॅट्स समोर आल्या होत्या. ज्यावरुन राजने पॉर्न फिल्म बनवण्याच्या व्यवसायातून चांगली कमाई केल्याचे समोर आले होते. चित्रपटांमधून राज दररोज 8 लाखांची कमाई करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

राज कुंद्राने पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नावावर 5 फ्लॅट ट्रान्सफर केले असल्याची माहिती नुकतीच पुढे आली होती. वृत्तानुसार, राज कुंद्राने मुंबईतील किनारा या बंगल्याचा संपूर्ण पहिला मजला पत्नी शिल्पा शेट्टी कुंद्राच्या नावावर हस्तांतरित केला आहे, ज्यात 5 फ्लॅट आहेत. या मालमत्तेची किंमत 38.5 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

SCROLL FOR NEXT