साम टिव्ही
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी आपल्याला मानसिक त्रास दिल्याचे सांगत शर्लिनने आपल्या वकिलांच्या माध्यमातून या दोघांना ७५ कोटींच्या नुकसान भरपाईच्या मागणीची नोटीस पाठवली आहे
राज कुंद्राचे नांव पोर्न रॅकेटमध्ये उघड झाल्यानंतर शर्लिन चोप्राने राज आणि शिल्पावर अनेक आरोप केले
काही दिवसांपूर्वीच शर्लिनने जुहू पोलिस ठाण्यात राज आणि शिल्पा यांच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल केली होती. आपला लैंगिक छळ केल्याची ही तक्रार होती. पत्रकार परिषदेतही तिने राज व शिल्पावर आरोप केले होते
त्यानंतर शिल्पा व राज कुंद्राच्या वकिलांनी शर्लिन चोप्राला ५० कोटींची मानहानीची नोटिस बजावल्याचे वृत्त एका वेब पोर्टलने दिले आहे
या नोटिसीला उत्तर देताना शर्लिन चोप्राने आपला मानसिक छळ होत असल्याचे सांगत ७५ कोटींची मागणी केली आहे
आपल्याला अंडरवर्डकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचाही शर्लिनचा आरोप आहे
शर्लिन चोप्रा व राज कुंद्रा-शिल्पा शेट्टी यांच्या सुरु असलेल्या युद्धात आता नक्की कोणाची बाजू खरी असा प्रश्न चित्रपट चाहत्यांना पडला आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.