Raj thackeray and uddahv thackeray  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : ठरलं! 'किरकोळ भांडणं बाजूला....'; राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, कुणी दिली मोठी हिंट?

Raj thackeray and uddahv thackeray : राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु झाल्या आहे. ठाकरे गटानेच ट्विटर हँडलवर त्यांचा एकत्र फोटो ट्विट केल्याने आणखी चर्चा वाढली आहे.

Vishal Gangurde

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. युतीच्या प्रस्तावावर मनसे आणि ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांकडूनही सकारात्मक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज ठाकरे यांच्या प्रस्तावावर संजय राऊत यांनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेनंतर आता थेट ठाकरे गटाच्या ट्विटर हँडलवरून दोन्ही बंधूंचा एकत्र फोटो ट्विट करण्यात आला आहे. ठाकरे गटाने ट्विटर हँडलवर फोटो पोस्ट केल्यानंतर राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेची ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या प्रस्तावावर भाष्य केलं. उद्धव ठाकरे यांनी युतीच्या प्रस्तावावर भाष्य केल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले, ' माझं मत असं आहे की, मराठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे. मी मराठी आणि महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो. माझी अट एक आहे, आम्ही लोकसभेला सांगत होतो की, महाराष्ट्रातून गुजरातमध्ये कारभार, उद्योग घेऊन जात आहेत. तेव्हाच विरोध केला असता तर सरकार तिकडे बसलं नसतं. आज महाराष्ट्राच्या हिताचं सरकार तिकडे बसलं असतं'.

'आपण काळे कामगार कायदे कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिले असते. तेव्हा पाठिंबा द्यायचा. आता विरोध करायचा. नंतर तडजोड करायची. महाराष्ट्र हिताच्या आड येणाऱ्यांचं स्वागत करणार नाही. त्याला घरी बोलावणार नाही. मी त्यांचासोबत जाणार नाही. स्वागत वगैरे, त्यांच्या पंगतीला बसणार नाही हे आधी ठरवा. त्यानंतर महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. आमच्यातील भांडणं मिटवून टाकली. खरंतर आमच्यात भांडणं नव्हतीच, असे ठाकरे म्हणाले.

'आता सर्व मराठी माणसांनी ठरवायचं आहे की, शिवसेना आणि भाजपसोबत राहायचं. शिवसेना म्हणजे एसंशि नाही. गद्दार सेना नाही. पण ठरवा की, महाराष्ट्राचं हित शिवसेना की भाजपसोबत राहून होईल. पाठिंबा द्या किंवा बिनशर्त पाठिंबा द्या. माझी काही हरकत नाही. चोरांना गाठीभेटी आणि कळत नकळत, त्यांचा प्रचार करायचा नाही. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्यायची, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Pink Saree: नवविवाहीत स्त्रीयांनी श्रावणात सणासुदींसाठी नेसा 'ही' सुंदर गुलाबी साडी

Lonavala-Khandala Tourism: 'या' विकेंडला मस्त भिजायचंय? लोणावळा-खंडाळ्यातील 'या' धबधब्यांची नाव आताच नोट करा

SCROLL FOR NEXT