aaditya thackeray News  Saam tv
मुंबई/पुणे

ठाकरेंचं मराठीप्रेम निवडणुकीपुरतंच? निवडणुकीनंतर मराठी अस्मितेला तिलांजली, VIDEO

aaditya thackeray News : मुंबई महापालिका निवडणुकीच्या अवघ्या दोन महिन्यातच ठाकरेंनी मराठी अस्मिता खुंटीला टांगल्याचं चित्र निर्माण झालंय... त्याचं नेमकं कारण काय? ठाकरेंवर मराठी अस्मित खुंटीला टांगल्याचा आरोप का केला जातोय? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

Bharat Mohalkar

मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला ठाकरेंची उपस्थिती...अस्मिता खुंटीला आणि ठाकरे गेले वाढदिवसाला ...मराठीच्या नावाने केलेल्या वल्गना, वेळोवेळी भाजप आणि मोहित कुंबोज यांच्यावर केलेली टीका ही किती पोकळ आहे हेच या व्हिडीओतून दिसतंय... भाजप आणि मोहित कुंबोजवर टीकेची झोड उठवणाऱ्या ठाकरेसेनेच्या आदित्य ठाकरेंनी आणि मनसेचे नेते राज ठाकरेंनी ी मोहित कुंबोजच्या मुलीच्या वाढदिवसाला हजेरी लावली... आणि राज्यात एकच खळबळ उडालीय....तर भाजप आणि शिंदेसेनेच्या हाती आयतं कोलित मिळालंय.

दुसरीकडे ठाकरेंच्या दुटप्पी भूमिकेमुळे टीकेची झोड उठल्यानं संजय राऊतांवर सारवासारव करण्याची वेळ आली...

खरं तर 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं.. त्यानंतर मोहित कंबोज आणि ठाकरेसेनेत अनेकदा संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळालं... त्यानंतर ऐन कोरोना काळात 22 एप्रिल 2022 ला शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला करत पिटाळून लावलं होतं.

पुढे मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी मराठी विरुद्ध अमराठी हा अस्मितेचा मुद्दा तीव्र केला... यावेळी मोहित कंबोज यांना लक्ष्य करण्यात आलं होतं... आता निवडणुकीच्या निकालानंतर आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे थेट मोहित कंबोजच्या मुलीच्या वाढदिवसाला हजर राहिले... त्यामुळे मराठी अस्मितेचा मुद्दा फक्त निवडणुकीपुरताच होता का? असा सवाल आता विचारला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT