लोणावळा : लोणावळ्यात (lonavala) पावसाची (rain) तुफान बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे लोणावळा खंडाळा परिसरात नैसर्गिक धबधबे (waterfall) वाहू लागलेत.पर्यटकांचे (tourists) नंदनवन असलेल्या पर्यटननगरीत पर्यटकांची मांदियाळी पहावयास मिळाली. (lonavala rain updates)
कोरोनामुळे (Corona) गेली दोन वर्षे पर्यटन बंद असल्याने नागरिकांचा हिरमोड झाला होता. परंतु यंदा पर्यटनाला चालना मिळाल्याने आणि पावसाची साथ असल्याने पर्यटनाच्या नगरीत नागरिक निसर्गाचा आनंद घेऊ लागले आहेत.
लोणावळ्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली त्यामुळे पर्यटकांची पावले लोणावळ्याकडे वळू लागलीत. दरम्यान लोणावळा शहर पोलीसांची करडी नजर या पर्यटकांवर असणार आहे. तीन ठिकाणी चेक पोस्ट लावण्यात आले आहे. मुंबईवरून येताना खंडाळा येथे एक चेक पोस्ट तर पुण्यावरून येताना कुमार चौकात दुसरी चेक पोस्ट असेल.
भुशी डॅम आणि टायगर पॉईंटला सहारा ब्रिजवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांना समज देऊन वेळप्रसंगी त्यांच्या कारवाई केली जाणार आहे. मद्यपान करून धिंगाणा घालणाऱ्यांवर लगेच कारवाई करणार असल्याचा इशारा लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सीताराम दुबल यांनी दिला.
पावसाळ्यात लोणावळ्यातील सहारा ब्रिज पॉइंटवर पर्यटकांची झुंबड उडते. यंदा देखील या ठिकाणी निसर्गाचं अनोखं रूप पर्यटकांना पहावयास मिळत असल्याने पर्यटकांची गर्दी वाढली आहे. पावसाची बरसात सुरू झाल्याने निसर्गाचं एक वेगळं रूप पर्यटकांना भुरळ घालत आहे. मुसळधार पावसात गरमा गरम कणीस खाण्याची एक औरच मजा पर्यटक लुटत आहेत.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.