Weather Alert! 'या' राज्यात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज  Saam Tv
मुंबई/पुणे

Weather Alert! 'या' राज्यात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज

ऐन हिवाळ्यामध्ये मागील काही दिवसापासून महाराष्ट्राबरोबरच देशात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरीलावली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: ऐन हिवाळ्यामध्ये मागील काही दिवसापासून महाराष्ट्राबरोबरच देशात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी (rainfall) लावली आहे. दरम्यान काही ठिकाणी झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे (farmers) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे असताना देखील राज्यामध्ये (state) परत एकदा अवकाळी पावसाचे (rain) ढग निर्माण होत आहेत. आज पासून पुढील ३ दिवसामध्ये मुंबई (Mumbai) पुण्यासह राज्यात अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे राज्यात शेतकऱ्यांची चिंता वाढताना दिसून येत आहे.

हे देखील पहा-

हवामान विभागाने (Meteorological Department) आज पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार (Nandurbar) या ४ जिल्ह्यामध्ये ढगाळ हवामानाची (weather) नोंद करण्यात आली आहे. आज सकाळापासूनच येथे ढगाळ हवामान आहे. पुढील २ ते ३ तासात या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. तर उद्या राज्यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. अगोदर पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीने येथील शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. यातच परत एकदा येथे अवकाळी पावसाचे ढग निर्माण होत आहेत.

उद्या मुंबईसह, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, औरंगाबाद, धुळे, जळगाव (Jalgaon) आणि नंदुरबार या ११ जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. यामुळे विकेंडला फिरायला जाण्याचा प्लॅन करणाऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. परवाच्या दिवशी (रविवारी) राज्यामध्ये पावसाचा जोर कमी होणार असून यादिवशी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या २ जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

२३ जानेवारी नंतर राज्यामध्ये पुण्यासह (Pune) उत्तर महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये गारठा (maharashtra) वाढण्याची शक्यता आहे. हा थंडीचा जोर पुढील २ दिवस कायम राहणार आहे. यानंतर राज्यात हवामान सामान्य होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात आज पाषाण याठिकाणी सर्वात कमी १०.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्याच बरोबर हवेली येथे १०.३, शिवाजीनगर ११, शिरूर ११.१, एनडीए ११.१, तळेगाव ११.३, माळीण ११.४, राजगुरूनगर ११.४ आणि इंदापूर याठिकाणी ११.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Suraj Chavan: 'मला वेड लावलयं...'म्हणतं रितेश भाऊंच्या गाण्यावर गुलीगत सूरजनं धरला ठेका, Video पाहा

Candidate List Party wise : निवडणूकीच्या रिंगणात किती पक्षांचे उमेदवार, शिवसेना-ठाकरे कोणत्या क्रमांकावर? अशी आहे संपूर्ण यादी

TMKOC Fame Jheel Mehta: कोण आहे भिडेंचा जावई? 'तारक मेहता' फेम सोनू लवकरच अडकणार लग्नबंधनात; तारीखही ठरली

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; प्रॅक्टिसदरम्यान 'या' फलंदाजाच्या हाताला दुखापत

SCROLL FOR NEXT