Mumbai, Pune Rain Updates Saam TV
मुंबई/पुणे

Rain Updates: राज्यभरात पावसाची जोरदार बॅटींग; मुंबईसह ठाण्यात साचलं पाणी, पुणेकरांचीही तारांबळ

मागील काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा धुवाधार बॅटींगला सुरुवात केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मागील काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा धुवाधार बॅटींगला सुरुवात केली आहे. त्यानुसार मागील चार दिवसांपासून पुन्हा मुंबईसह राज्यभरात पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली आहे.

शिवाय ऐन पिक काढणीच्या काळातच सुरु झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे मोठं नुकसान झाले आहे. अशातच आज दुपारपासून मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यामध्ये पावसाने हजेरी लावली. (Mumbai, Thane And Pune Rain Updates)

सकाळपासून उन्हाचं वातावरण असताना अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. दुपारपासून मुंबई (Mumbai) आणि पूर्व उपनगरात ढगांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत असून त्याने अद्याप उसंत घेतली नाहीये. तो अद्याप कोसळतच आहे. या पावसामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमधील सखल भागात पाणी साचले आहे.

पुण्यात वाहतूक कोंडी -

पुण्यात (Pune) सकाळपासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण झाले होते. दुपारी पावसाची चिन्हे दिसू लागली होती. अखेर ३ च्या सुमारास धुवादार पावसाला सुरुवात झाली असून शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. पावसाबरोबर सुसाट्याचा वारं सुटल्याने रस्तेही सामसूम झाले होते.

दरम्यान, पुण्यात पुन्हा पाणी साचण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अचानक सुरु झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले आहे. तर सासवड रस्त्यावरील दिवेघाटात तर ढगफुटी सदृश पाऊस झाला असून त्यामुळे रस्त्याला ओढ्याचं स्वरूप आलं होतं. मस्तानी तलावही ओसंडून वाहत आहे. पुण्यात सांयकाळच्या सुमारास झालेल्या पाऊसामुळे एफसी रोडवरील गुड लक चौकात काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.

पावसामुळे कापसाचे मोठे नुकसान -

औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात आज जोरदार पाऊस पडला असून या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन, मका, बाजरी या पिकासोबतच कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा औरंगाबाद जिल्ह्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडल्याने आधीच पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. आता उरली सुरली पिकेही पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाल्यामुळे नदी नाल्याना पुन्हा पुरासारखी स्थिती निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की झटका? कोर्टात काय घडलं?

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

माणिकराव कोकाटेंना जेल की बेल, फैसला कधी? न्यायमूर्तींनी एका वाक्यात सांगितलं | VIDEO

SCROLL FOR NEXT