Pune Rain Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Rain : पुणेकरांनो! पावसाचे संकट कायम; ३ दिवस पावसाचा अंदाज, येलो अलर्ट जारी

Weather Update : पुणे शहरासह उपनगरांमध्ये तीन दिवस पावसाचा अंदाज

Dnyaneshwar Choutmal

Pune Weather Update : एकीकडे राज्यात तापमान वाढत होत असल्याचे चित्र असताना दुसरीकडे अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भ, मराठवाड्यासह इतरही भागाला पावसाने झोडपून काढलं आहे. अशातच हवामान विभागाकडून पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  (Latest Marathi News)

पुणे (Pune) शहरासह उपनगरांमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील तीन दिवस पुण्यात अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हवामान खात्याकडून पुढील २ दिवस पुण्यात (Pune) येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. आज आणि उद्या शहरात जोरदार पावसाचा होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच उष्णतेचा पारा देखील वाढणार आहे. तापमान ४० अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. (Pune Rain)

'या' भागात मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सांगली, सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस (Rain) पडण्याची शक्यता आहे.

येलो अलर्ट म्हणजे काय?

यलो अलर्ट ही हवामानाबाबत धोक्याची पहिली घंटा आहे. जेव्हा हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला तेव्हा ते तुम्हाला सतर्क राहण्यास सांगतात. अशा परिस्थितीत तुम्हाला काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. यलो अलर्ट जारी करण्याचा उद्देश लोकांना सतर्क करणे हा आहे. यानुसार, तुम्हाला काळजी घेणे महत्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather : आंध्रच्या किनाऱ्याला धडकणार चक्रीवादळ, महाराष्ट्रातील 'या' भागात धो-धो पावसाचा अंदाज; हवामान विभागाचा नवा इशारा

Maharashtra News Live Update: नागपूर विमानतळावर महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानाची नागरिकांना मारहाण

Monday Horoscope : नवीन जबाबदाऱ्या मिळतील! ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

SCROLL FOR NEXT