Monsoon Session Saam TV
मुंबई/पुणे

Rain Effect on Monsoon Session : विधानसभा अधिवेशनात पावसाचा 'गदारोळ', ४ ऑगस्टपर्यंतच कामकाज, पण उरलेल्या ८ पैकी ४ दिवस सुट्टी

Political News : अधिवेशनाचं कामकाज पूर्णवेळ म्हणजेच ४ ॲागस्टपर्यंत सुरू ठेवण्याचा बैठकीत निर्णय झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे

Mumbai News : राज्यातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. नागरिकांना देखील अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

मात्र पावसाळी अधिवेशनामुळे लोकप्रतिनिधी मुंबईत आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या विभागात लक्ष देणे कठीण जात आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशन थांबवण्याची मागणी काही आमदारांनी केली होती. मात्र तुर्तास अधिवेशनाला ४ दिवस सुट्टी देण्यात आला आहे.

सध्याच्या स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक आज पार पडली. अधिवेशनाचं कामकाज पूर्णवेळ म्हणजेच ४ ॲागस्टपर्यंत सुरू ठेवण्याचा बैठकीत निर्णय झाला आहे. (Latest Marathi News)

बैठकीत झालेल्या निर्णयानुसार अधिवेशन कामकाजाला शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार अशी ४ दिवस सुट्टी असेल. अधिवेशनाला सुट्टी दिल्याने आमदारांना आपल्या भागात पाहणी करुन आढावा घेता येणार आहे. (Political News)

फक्त ४ दिवस चालेल अधिवेशन

अधिवेशनाचं कामकाज ४ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. म्हणजे अधिवेशनाचे आजपासून ८ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यापैकी ४ दिवस सुट्टी असणार आहे. म्हणजे यापुढे अधिवेशनाचं कामकाज फक्त ४ दिवस सुरु असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यातील रस्त्यांवर टोळक्यांची दहशत; १७ वर्षीय मुलावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला

मोठी अपडेट! दादांच्या विमानाचा पायलट वैफल्यग्रस्त? पवारांचा दिल्लीतून नवा बॉम्ब

अलिबागच्या समुद्रात उलटली प्रवासी बोट? कुणी लपवला अपघाताचा व्हिडिओ?

अरोरांची राज्यसभेसाठी फिल्डिंग? भुजबळ अस्वस्थ, कोल्हेंचा मोठा दावा

शिवजयंतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा अपमान, भाजपच्या बुचकेंची अरेरावी? राष्ट्रवादीत संतापाची लाट, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT