मुंबईसह उपनगरामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस (Mumbai Heavy Rainfall) पडत आहे. या पावसामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. गुरुवारी हवामान खात्याने मुंबईला पावसाचा रेड अलर्ट (Red Alert In Mumbai) जारी केला होता. अशामध्ये आता हवामान खात्याने हा रेड अलर्ट शुक्रवारपर्यंत वाढवला आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अशामध्ये अतिमुसळधार पावासामुळे उद्या देखील शाळांना सुट्टी (School And College Closed) देण्याची शक्यता आहे.
मुंबईसह उपनगरामध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे मुंबई महानगर पालिकेने गुरुवारी महापालिका, शासकीय आणि खासगी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती. त्याचसोबत मुंबईकरांना सतर्क राहण्याचे, घरात राहण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. अशामध्ये आता मुंबईला देण्यात आलेला पावसाचा रेड अलर्ट शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत वाढवण्यात आला आहे. आज संध्याकाळपर्यंत या रेड अलर्टची मुदत देण्यात आली होती. पण आता त्यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे.
मुंबईचा रेड अलर्टचा कालावाधी १२ तासांपेक्षा जास्त काळाने वाढवण्यात आला आहे. मुंबईचा रेड अलर्ट शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत लागू करण्यात आला असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. या कालावधीत मुंबईत अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी, घराबाहेर पडून नये असे सांगितले जात आहे. अतिमुसळधार पावासामुळे उद्या देखील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जारी करण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याने गुरुवारी मुंबईसह रत्नागिरी, पुणे, गडचिरोली, चंद्रपूर आणि सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला होता. मुंबईमध्ये गेल्या २४ तासांमध्ये हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात २२३.२ मिमी, सांताक्रूझ केंद्रात १४५.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दक्षिण मुंबईत सध्या पावासाचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईतील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.