Balasaheb Thorat:पेणमधील मुलीचा सर्पदंशामुळे झालेला मृत्यू हा सरकारी अनास्थेचा बळी; सभागृहात बाळासाहेब थोरातांची जोरदार टीका

राज्यभरात सर्पदंशावरील औषधांचा काळाबाजार कुणाच्या आर्शीवादाने सुरू आहे? बाळासाहेब थोरातांचा सरकारला सवाल
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSaam tv
Published On

मुंबई: पेणमधील बारा वर्षीय सारा ठाकूर या मुलीचा सर्पदंशामुळे झालेला दुर्दैवी अंत हा सरकारी अनास्थेचा बळी आहे. सर्पदंशावरील औषध उपजिल्हा रुग्णालयात सक्तीचे असतानाही, पेणच्या रूग्णालयात ते उपलब्ध का नव्हते, याची चौकशी करून सरकार जबाबदारी निश्चित करणार आहे का? दोषींवर कठोर कारवाई करणार आहे का? राज्यभर सर्पदंशावरील औषधांचा काळाबाजार कुणाच्या आर्शीवादाने सुरू आहे? असे सवाल उपस्थित करून थोरात यांनी सरकारला धारेवर धरले. (Latest Marathi News)

बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात १२ वर्षीय मुलीच्या सर्पदंशामुळे झालेल्या मृत्यूवरून सरकारला जाब विचारला. थोरात म्हणाले, ‘पेणमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे. या घटनेचा थेट संबंध शासन व शासकीय यंत्रणेशी आहे'.

'आपण पुरोगामी राज्य असल्याची जाहिरात करतो, पण सर्पदंशावरील साधे इंजेक्शन, जे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांना उपलब्ध ठेवण्याचे सक्तीचे आदेश असतात. पण सरकारच्या दुर्लक्षामुळे या रूग्णालयांना मिळालेला हा कोटा काळ्या बाजारात विक्री केला जातो आणि सामान्य जनतेच्या जिवाशी खेळ खेळला जात आहे', असा आरोप थोरांनी केला.

Balasaheb Thorat
Pavsali Adhiveshan 2023: शिंदे सरकार पावसाळी अधिवेशन लवकरच गुंडाळणार? काय आहे कारण?

'या दुर्देवी घटनेतील मुलगी कु. सारा रमेश ठाकूर ही केवळ १२ वर्षाची होती, सातवीच्या वर्गात शिकत होती. सर्पदंशानंतर तिला तत्काळ पेण उप जिल्हा रुग्णालयात नेले असता उपचाराची साधने नसल्याचे कारण देत तिच्यावर उपचार न करता परत पाठवले. वास्तविक पेण रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने हे इंजेक्शन उपलब्ध करुन या मुलीचा जीव वाचविणे आवश्यक होते, पण तसे न करता त्यांनी उपचारास नकार दिला ही अक्षम्य चूक आहे, असे थोरात म्हणाले.

'साराला खासगी रुग्णालयात नेले तिथून तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला देऊन उपचार नाकारला, इतकी भयंकर व लाजिरवाणी घटना घडलेली आहे. तिचा मृत्यू सर्पदंशामुळे नाही तर सरकारी अनास्थेमुळे, आरोग्य विभागाच्या गलथानपणामुळे झाला आहे, असा आरोप थोरात यांनी केला आहे.

Balasaheb Thorat
Mantrimandal Vistar 2023: मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार लवकरच, पालकमंत्रिपदाच्याही अदलाबदलीची शक्यता, पुण्याचं काय?

थोरात पुढे म्हणाले, साराच्या शाळेतील मुले, शिक्षक व ग्रामस्थांनी तिच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त केली, पुन्हा ती सातवीच्या वर्गात दिसणार नाही, याची खंत व्यक्त केली. पण ढिम्म शासनावर त्याचा काहीच परिणाम दिसत नाही. या निष्पाप कोवळ्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या बेजबाबदार व बेफिकीर आरोग्य अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई झाल्याशिवाय आजचे सभागृहाचे कामकाज पुढे घेऊ नये, असे थोरात म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com