Mumbai School Holiday Declared  Saam tv
मुंबई/पुणे

Rain Alert: मुंबईसह ठाणे-रायगडमध्ये पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस; पालघर- ठाण्यात उद्या शाळांना सुट्टी

Palghar- Thane School Holiday Declared: राज्यात पुढचे ३ दिवस मुसळधार पावसाचे असणार आहेत. ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पालघर- ठाण्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली.

Priya More
  • राज्यात ४ ते ६ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा

  • मुंबई, ठाणे, रायगड आणि कोकणातील जिल्ह्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता

  • ठाणे आणि पालघरमध्ये रेड अलर्टमुळे शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

  • प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले

राज्यासाठी पुढचे ३ दिवस महत्वाचे असणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. ४ ते ६ जुलै दरम्यान मुंबई, ठाणे, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या पावसामुळे ठाणे, पालघर, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर येथील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना देखील सतर्क राहण्याचे आणि गरज असल्यास घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ४ ते ६ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरातही ४ ते ६ जुलै या कालावधीत मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या काळात नागरिकांनी सतर्क राहावे. या कालावधीमध्ये नागिरकांनी विशेषतः सखल भागांमध्ये आणि घाट रस्त्यांवर प्रवास करताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून आणि प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हवामान विभागाने ठाणे, पालघर जिल्ह्यासाठी ४ जुलै रोजी रेड अलर्ट जारी केल्यामुळे ठाणे, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अतिमुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, पाणी साचणे आणि पूरस्थितीची शक्यता लक्षात घेऊन शनिवार ४ जुलै रोजी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अंबरनाथ, बदलापूर, मुरबाडमधील शाळाही बंद राहणार आहेत.

उद्या महानगरपालिका हद्दीतील सर्व राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई तसेच इतर सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील परिस्थितीनुसार आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना शाळा आणि महाविद्यालय प्रशासनाला देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ४ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी

Blood Pressure : औषधांशिवायही BP नियंत्रणात राहू शकतो! हृदयरोगतज्ज्ञांनी सांगितले ७ सोपे उपाय

Ghabadkund Collection: मराठी चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर डंका; 'घबाडकुंड'चा दोन आठवड्यांत ८ कोटींपेक्षा जास्त गल्ला

Crime: १३ वर्षीय भाचीचं अपरहण, शेतात नेऊन मामाकडून बलात्कार; नंतर गळा दाबून संपवलं

Lemon Coriander Soup: मान्सून स्पेशल रेसिपी! गरमागरम लेमन कोरिअँडर सूपने वाढवा जेवणाची मजा, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT