Railway Megablock Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Railway Mega Block : रविवारी 'या' मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई विभागात रेल्वेची अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे रविवारी करण्यात येणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबई विभागात अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी ११ सप्टेंबरला मेगाब्लॉग घेण्यात येणार आहे. सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत माटुंगा- मुलुंड अप आणि डाउन धिम्या मार्गावर मेगाब्लॉग असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. (Mumbai Railway Megablock on sunday)

या सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान शीव,कुर्ला,घाटकोपर,विक्रोळी,भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबून पुन्हा डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशीराने पोहचेल. ठाणे येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.५९ वाजेपर्यंत अप धिम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा मुलुंड,भांडुप, विक्रोळी,घाटकोपर,कुर्ला आणि शीव येथे थांबतील. पुढे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.

'असा' असेल वेळापत्रक

पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत. (बेलापूर किंवा नेरुळ-खारकोपर लाईन वगळून)

पनवेल/बेलापूर येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटून ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल करीता जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागामध्ये विशेष उपनगरी (लोकल) ट्रेन चालविण्यात येतील.

ब्लॉक कालावधीत ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ-खारकोपर लाईन सेवा उपलब्ध असतील.हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत.प्रवाशांना होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाकडे दिलगीरी व्यक्त केली आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Tourism : पाऊस, समुद्रकिनारा अन् गरम चहा; मुंबईतील 'हे' प्रसिद्ध ठिकाण, जेथे असते दिवसरात्र गर्दी

Thackeray Brothers : ठाकरेंचं ठरलं का? दसरा मेळाव्यात युतीचं तोरण बांधणार का? शिवाजी पार्कवर राज ठाकरे विचारांचं सोनं लुटणार का?

Thursday Horoscope : जोडीदारासोबत आज काय घडणार? ही रास तुमची तर नाही? वाचा गुरुवारचे भविष्य

Crime : बीडमधील माजी उपसरपंचाचा सोलापुरात संशयास्पद मृत्यू, तक्रारीत नर्तिकेचं नाव; नातेवाईकांना वेगळाच संशय

Toyota Cars Offers: अंबाबाईच्या नावानं चांगभलं! फक्त ९९ रुपयांच्या हप्त्यांमध्ये घरी आणा कार, अन् ५ फ्री सर्विससह ४ धमाकेदार फायदे

SCROLL FOR NEXT