रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लकी यात्री योजना (Lucky Yatri Yojana) राबवण्यात आली आहे. या योजनेत आता उपनगरीय स्थानकांवर एका भाग्यवान तिकीट धारकाला दररोज १०,००० रुपये रोख बक्षीस दिले जाणार आहे. तसेच आठवड्याला ५०,००० रुपये बक्षीस देण्याचे आश्वासन दिले आहे.
विनातिकीट प्रवाशांना आळा घालण्यासाठी ही नवीन आयडिया रेल्वेने केली आहे. अनेक लोक विनातिकीट प्रवास करतात. त्यामुळे प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.
लकी यात्री योजनेत एका भाग्यवान प्रवाशाला रोज १०,००० रुपये बक्षीस (Prize) मिळणार आहे. यामुळे जास्तीत जास्त प्रवासी रोज तिकीट काढून प्रवास करतील. ही योजना आठ आठवड्यांसाठी राबवण्यात आली आहे.ही योजना FCB इंटरफेस कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड द्वारे राबवण्यात आली आहे.
रोज मध्य रेल्वेने ४० लाख प्रवासी प्रवास करतात. यामध्ये अंदाजानुसार २० टक्के लोक विनातिकीट प्रवास करतात. दररोज ४ ते ५ हजार तिकीट नसलेले प्रवासी पकडले जातात. या विनातिकीट प्रवाशांनाच आळा घालण्यासाठी ही नवीन आयडिया करण्यात आसी आहे.
प्रवाशांना तिकीट घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि नियमित बक्षीस देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. दररोज भाग्यवान तिकीटधारकाला १०,००० रुपये दिले जातील. तर आठवड्याच्या निवडलेल्या विजेत्याला ५०,००० रुपये दिले जातील. असं सीएसआरचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला म्हणाले आहेत. विजेत्याची निवड तिकीट चेकर स्टेशनवरच करणार आहे. भाग्यवान प्रवाशाने तिकीट किंवा सीझन पास दिला तर त्याला पडताळणीनंतर लगेचच बक्षीस दिले जाईल.या योजनेमुळे प्रवाशांवर अतिरिक्त शुल्काचा भार पडणार नाही, असंही एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.