Shivrajyabhishek Sohala 2023,
Shivrajyabhishek Sohala 2023,  saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Goa Highway News : वाहतुकदारांनाे ! मुंबई गोवा महामार्गावर चार दिवस अवजड वाहनांना बंदी; जाणून घ्या कारण

Siddharth Latkar

- सचिन कदम

Raigad News : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या (Shivrajyabhishek Sohala 2023) पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने आज मध्यरात्री १२ वाजल्यापासून मुंबई गोवा महामार्गासह (Mumbai Goa Highway) इतर राज्य मार्गांवर अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घातली आहे. या आदेशाचे पालन वाहतुकदारांनी करावे असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे. (Maharashtra News)

छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांचा किल्ले रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. हिंदवी स्वराज्यातील या ऐतिहासिक घटनेला या वर्षी 350 वर्ष पुर्ण होत आहेत. गेली अनेक वर्ष शिवप्रेमी संघटना शिवराज्याभिषेक दिन साजरा करत असुन या वर्षी महाराष्ट्र शासनाने हा सोहळा दिमाखदार पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. याची जय्यत तयारी किल्ले रायगडावर सुरू आहे. याबराेबरच एनसीपीने देखील हा उत्सव साजरा करण्यासाठी तयारी सुरु केली आहे.

यंदाच्या साेहळ्यास माेठ्या संख्येने शिवभक्त रायगडला येणार असल्याने परिवहन विभागाने मुंबई गाेवा महामार्गावर शिवभक्तांना वाहतुक सुलभ व्हावी यासाठी अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

परिवहन विभागाने काढलेल्या आदेशानूसार १ व २ जून तसेच ५ व ६ जून या दिवशी महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये १६ टन आणि त्यापेक्षा जास्त वजन क्षमतेच्या जड, अवजड वाहने, ट्रक, मल्टी एक्सल ट्रेलर यांना वाहतूकीसाठी बंदी घालण्यात आली आहे.

महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे यामुळे राज्यभरातून येणाऱ्या शिवभक्तांची वाहतूक कोंडीने गैरसोय होऊ नये यासाठी अवजड वाहनांना वाहतूकीस बंदी घालण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : आम्ही कायम भांडत रहावं आणि...; आदित्य ठाकरेंच्या आरोंपांवर दीपक केसरकरांचा पलटवार

Today's Marathi News Live : उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार

Health Tips: सकाळी आंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट मिसळा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक; नागपुरातील निवास्थानाबाहेर निदर्शने

Mumbai News: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT