Pen Taluka Police Patil Crime Saam TV
मुंबई/पुणे

Raigad Crime : रायगड हादरलं! १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल होताच पोलीस पाटील फरार

Pen Taluka Police Patil Crime : गावातील पोलीस पाटलानेच एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा पेन तालुक्यात घडला आहे.

Satish Daud

महाराष्ट्रात महिला तसेच अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. दोन दिवसापूर्वी पुण्यात एका स्कूलबस चालकाने 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच रायगडमधील पेन तालुक्यातही अशाच प्रकारची घटना घडली आहे. गावातील पोलीस पाटलानेच एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलीस पाटील फरार झाला आहे. पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे पेण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.

रमेश अंबाजी पाटील (वय ६२) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस पाटलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची पीडित मुलीच्या वडिलांसोबत चांगली मैत्री आहे. याचाच फायदा घेऊन त्याने पीडितेवर बलात्कार केला. याविषयी कुणाला सांगितल्यास तुझ्या वडिलांना ठार मारेन, अशी धमकीही दिली.

घडलेल्या प्रकारानंतर पीडिता प्रचंड घाबरली. तिने याची वाच्यता कुणाकडेही केली नाही. याच गोष्टीचा फायदा घेऊन आरोपीने पीडितेवर वारंवार बलात्कार केला. गेल्या दोन वर्षांपासून आरोपी हा पीडितेचे लैंगिक शोषण करत होता. त्यासाठी त्याने तिला पेण तालुक्याच्या बाहेरदेखील नेले होते. पीडित मुलगी पूर्णपणे आरोपीच्या वासनेची शिकार झाली होती.

आरोपीकडून वारंवार लैंगिक शोषण होत असल्याने पीडितेला वेदना असह्य झाल्या. तिने मोठ्या हिमतीने हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यांनी तातडीने वडखळ पोलीस ठाण्यात तक्रार धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करताच आरोपी फरार झाला आहे. आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचा हप्ता लांबणीवर जाणार; जानेवारीत खात्यात ₹४५०० जमा होण्याची शक्यता

Panchag Today: आजचा दिवस बदल घडवणारा! या 4 राशींवर नशीब होणार मेहरबान

Manikrao Kokate Arrest Update: माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रूग्णालयात, पण...

Maharashtra Politics : कल्याणमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! 'या' बड्या नेत्याने घेतलं धनुष्यबाण हाती

SCROLL FOR NEXT