Mumbai-Pune Express Way Accident  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Express Way: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

Raigad Car And Container Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर हद्दीमध्ये हा भीषण अपघात झाला. पुण्यावरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारने कंटेनरला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला.

Priya More

सचिन कदम, रायगड

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन प्रवाशांचा मृत्यू झाला तर ३ जण जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दोन्ही वाहनं बाजूला काढण्यात आली असून वाहतूक सुरळीत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर हद्दीमध्ये हा भीषण अपघात झाला. पुण्यावरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारने कंटेनरला पाठीमागून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ३ जण किरकोरळ जखमी झाले. अपघातानंतर एक्स्प्रेस वेवरील मुंबई लेनवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अपघातामध्ये जखमी झालेल्या तिघांना तात्काळ खोपोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर अपघातामधील दोन्ही मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. ही दोन्ही वाहनं रस्त्याच्या बाजूला काढण्यात आली आहे. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

दरम्यान, पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात कारने दुचाकीला चिरडल्याची घटना घडली. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला. मध्यरात्री पावणे तीनच्या सुमारास हा अपघात झाला. स्वप्निल प्रदीप खरबडे असे मृत तरुणाचे नाव आहे. स्वप्निल भोसरीतील लांडेवाडीमध्ये राहत होता. आर्मी स्कूलच्या समोर ही अपघाताची घटना घडली होती. यामध्ये स्वप्निलचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणाचा योग्य तपास करावा यासाठी स्वप्निलच्या नातेवाईकांनी विश्रांतवाडी पोलिस स्टेशनसमोर आंदोलन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फोनवर बोलणं, गाणं ऐकणं नकोच! PMPML च्या कंडक्टर- ड्रायव्हरसाठी नवे नियम

Workout Tips: सकाळी व्यायाम करायच्या आधी काय खावे?

Fact Check : कपड्यांच्या शोरूममध्ये भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Shocking : ऑनलाइन डेटा चोरी, महिलेचे नग्नावस्थेतील फोटो, व्हिडीओ व्हायरल; कंपनीवर खटला दाखल

Shani Shingnapur : अभिषेक आता फक्त १०० रूपयांत येणार; शनिशंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळाचा निर्णय, VIDEO

SCROLL FOR NEXT