Raigad Fort Trek Closed For Two Days Know The Reason Saam Digital
मुंबई/पुणे

Raigad Fort Trek News: शिवप्रेमींसाठी महत्वाची बातमी, किल्ले रायगडावरील पायरी मार्ग राहणार दाेन दिवस बंद; जिल्हाधिका-यांचा आदेश

Raigad Fort Trek Closed For Two Days: तरी गडावर जाणारे पायरी मार्ग दोन दिवस बंद राहणार असल्याची नोंद शिवभक्त व पर्यटकांनी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी जावळे यांनी केले आहे.

Siddharth Latkar

- सागर आव्हाड

किल्ले रायगड येथे सध्या डागडुजीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे बुधवारी (ता. 23 मे) व गुरुवारी (ता. 24 मे) असे दाेन दिवस पायरी मार्ग पर्यटक, शिवभक्तांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. याची नाेंद शिवभक्त व पर्यटकांनी घ्यावी असे अवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

किल्ले रायगड येथे येत्या 6 जून रोजी 351व्या शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याला संपूर्ण राज्यभरातील शिवभक्त शिवरायांना वंदन करण्यासाठी रायगडावर येत असतात. या साेहळ्याला किल्ले रायगडावर माेठ्या प्रमाणात शिवभक्तांची गर्दी राहणार.

गडावर काही ठिकाणी दरड कोसळून अपघात घडण्याची शक्यता लक्षात घेता. जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधक उपाय करण्यासाठी व धोकादायक सुट्टे दगड काढण्याचे काम गिर्यारोहकांच्या सहाय्याने करण्यात येणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ही बाब लक्षात घेता किल्ले रायगड येथे काही उपाययोजना करण्यासाठी व खबरदारी म्हणून 23 व 24 मे या दिवशी गडावर जाणारे पायरी मार्ग पर्यटक व शिवभक्तांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

तरी गडावर जाणारे पायरी मार्ग दोन दिवस बंद राहणार असल्याची नोंद शिवभक्त व पर्यटकांनी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी जावळे यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT