ED कडून मोठी कारवाई! अजित पवारांचे नातेवाईक जगदीश कदम यांच्या घरी छापेमारी Saam Tv
मुंबई/पुणे

ED कडून मोठी कारवाई! अजित पवारांचे नातेवाईक जगदीश कदम यांच्या घरी छापेमारी

जगदीश कदम यांच्या पुण्यामधील घरी ईडीच्या पथकाकडून छापा टाकण्यात आला

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या घरी आज सकाळी ईडीकडून झाडाझडतीला सुरूवात झाली आहे. जगदीश कदम यांच्या पुण्यामधील घरी ईडीच्या पथकाकडून छापा टाकण्यात आला आहे. जगदीश कदम हे दौंड शुगरचे संचालक आहेत. काही दिवसाअगोदर अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली होती.

यानंतर आता अजित पवारांच्या मामेभावाच्या घरावर ईडीकडून छापा टाकण्यात आला आहे. अजित पवार Ajit Pawar यांच्या निकटवर्ती यांच्या घरावर आयकर विभागाने काल Income Tax छापेमारी करण्यात आली आहे. याबरोबरच अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी, कार्यालयावर देखील आयकर विभागाकडून चौकशी करण्यात आली होती. अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले आयकर विभागाच्या रडारवर सापडले आहेत.

हे देखील पहा-

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसाअगोदर अजित पवारांचे निकटवर्तीय असलेल्यांच्या साखर कारखान्यांवर छापेमारी करण्यात आली होती. यासोबत अजित पवारांच्या पुण्यामधील २ बहिणी आणि कोल्हापूर या ठिकाणी बहिणीच्या कार्यालयावर छापेमारी करण्यात आली होती. आयकर विभागाच्या या कारवाईनंतर अजित पवारांनी सांगितले होते, ही राजकीय हेतूने इन्कम टॅक्सने रेड टाकली की त्यांना आणखी काही माहिती हवी होती. हे इन्कम टॅक्सचे अधिकारीच सांगू शकणार आहेत. माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकण्यात आली.

यावर मला काही बोलायचं नाही. कारण मी सुद्धा एक नागरिक आहे. मला एका गोष्टीचे दु:ख आहे. माझ्या बहिणी ज्यांची ३५-४० वर्षांपूर्वी लग्न झाले आहेत. त्या त्यांच्या- त्यांच्य़ा घरी अतिशय चांगल्या पद्धतीने सुखाचा संसार करत आहेत. त्यापैकी कोल्हापूर आणि पुण्यामधील २ बहिणींच्या कार्यालयावर इन्कम टॅक्सने धाड टाकली आहे. याच्या पाठीमागचे कारण मला आजून देखील समजू शकले नाही.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापरिनिर्वाण दिनासाठी मुंबईत वाहतूकीत बदल; काही मुख्य रस्ते बंद, तर काही वन वेवर सुरू

Maharashtra Elections : झेडपींआधी महापालिका निवडणुका? लवकरच घोषणा

Solapur: ८ वर्षे सोबत राहिले, पण प्रेमात धोका मिळाला, तृतीपंथीयाने आयुष्य संपवलं; आत्महत्येपूर्वी व्हिडीओ काढला अन्...

Valache Birde Recipe: अस्सल पारंपारिक पद्धतीचा वालाचा बिरडा कसा बनवायचा?

Kalyan : कल्याणमध्ये कायदा सुव्यवस्था धाब्यावर; नशखोरांची घरात घुसून दुकानदार दाम्पत्याला मारहाण

SCROLL FOR NEXT