हिंगोलीत सर्व बस आगारात उभ्या, कर्मचाऱ्यांनी केलं उपोषण
संदीप नागरे
हिंगोली : हिंगोलीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यासाठी अचानक आंदोलन करत, आगारामध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे. सकाळी दहा वाजता सर्व कर्मचाऱ्यांनी बसेस आगारात उभ्या करत प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. दरम्यान राज्य शासन जोपर्यंत गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण करणार नाहीत. तोपर्यंत एसटीची वाहतूक सुरू करणार नसल्याचा पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
नंदुरबार, जिल्ह्यातील चारही आगारातील एसटी प्रवासी वाहतूक बंद.
दिनू गावित
नंदुरबार : राज्यभर सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत आमरण उपोषणाला नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार आणि नवापूर आगारातील कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद देत आज सकाळपासूनच एसटी प्रवासी वाहतूक बंद करून, आपल्या मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. एसटी प्रवासी वाहतूक बंद असल्याने शालेय विद्यार्थी व प्रवाशांचे मात्र हाल झाले आहेत. जिल्ह्यातील चारही आगार ठप्प झाले, असून दिवसभरातून एक हजारपेक्षा अधिक फेऱ्या होत असतात. परंतु, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे चारी आगारातून प्रवासी वाहतूक सेवा बंद झाल्याने ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल सुरू झाल्याने शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे कळकळीने विचार करून मान्य कराव्या अशी मागणी प्रवासी देखील करू लागले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील एसटी ठप्प...
संजय जाधव
बुलढाणा : एसटीचे विलानीकरन राज्य सरकार मध्ये करावे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यानप्रमाणे सर्व सुविधा मिळाव्यासाठी कालपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. मागण्या मंजूर न झाल्याने ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर राज्यातील एसटी प्रवासी वाहतूक ठप्प केली आहे. या आंदोलनात सर्व चालक वाहक सामील झाल्याने एसटी चाक एकाच ठिकाणी थांबले आहे. यामुळे मात्र, प्रवाश्यांचे मोठे हाल होताना दिसत आहे. देशातील सर्व कामगार संस्था या त्या सर्व सरकारी आखतारीत असणे गरजेचे होते, तसे घटनेत नमूद आहे. मात्र, आताचे राज्य आणि केंद्र सरकार खाजगी करणात विलीन करण्याचा घाट घातले जात आहे. एसटी कामगार रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे.
हे देखील पहा-
वाशिम जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण जिल्ह्यातील चार आगारातील बस वाहतूक ठप्प...
गजानन भोयर
वाशिम : महागाई भत्ता अन एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलनिकरण करण्यात यावे. यासाठी आज सकाळपासूनच वाशिम मध्ये शंभर टक्के कर्मचाऱ्यांनी उपोषणाला पाठिंबा देत एकप्रकारे बस बंदची हाक दिली आहे. सकाळपासून जिल्ह्यातील कारंजा, मंगरुळपिर, रिसोड, आणि वाशिम या चारही आगारातील जवळपास १ हजार कर्मचारी उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे प्रवाशांचे ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रचंड हाल होत आहेत. ज्या गाड्या परजिल्ह्यातून आल्या ते सोडल्या जात आहेत. मात्र, स्थानिक आगारातील एकही बसची फेरी अद्याप झालेली नाही. दरम्यान जोपर्यंत कर्मचाऱ्यांना 28 टक्के महागाई भत्ता मिळत नाही. त्याच बरोबर एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण होत नाही. तोपर्यंत उपोषण आणि आंदोलन असचं सुरू राहील. असा इशारा आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
सांगली एसटी कर्मचारी बेमुदत संप सुरू, एसटी सेवा पूर्णपणे ठप्प प्रवाशांचे हाल
विजय पाटील
सांगली : एसटी कर्मचारी संघटना आणि राज्य सरकार यांच्यात झालेल्या चर्चेत तोडगा न निघाल्याने सांगलीमध्ये आजपासून बेमुदत एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामुळे पहाटेपासूनच सांगलीमध्ये एसटी सेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. तर काही प्रवाश्यानी खाजगी गाड्याचा सहारा घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी एसटी संघटना राज्य सरकारकडे गेले, अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत होते. कोरोना काळात एसटी कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. तसेच अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झालेला आहे. त्यांना पैसेही मिळाले नाही. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहचा प्रश्न सूटलेला नाही. तसेच त्यांच्या विविध मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू होता. पण यात तोडगा निघाले नसल्याने, आज पासून सांगली मध्ये एसटी कर्मचारी बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे सांगली जिल्ह्याची एसटी आता जागेवरच थांबलेली आहे. अचानक संप पुकारल्याने प्रवाश्या मध्ये खळबळ माजली आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.