Kalyan dombivli Latest news  Saam tv
मुंबई/पुणे

कल्याण-डोंबिवलीत 'छमछम', बारबालांचं अश्लील नृत्य; तब्बल २३ तरुणी सापडल्या, कसा सापळा रचला?

Kalyan dombivli Latest news : कल्याण-डोंबिवलीत 'छमछम'वर टाकण्यात आला. या कारवाईत २३ तरुणींची सुटका करण्यात आली.

Vishal Gangurde

कल्याण स्टेशन परिसरात वारांगना आणि दलालांवर पोलिसांची कारवाई

डोंबिवली रिगल बारवर छापा

२३ तरुणींची सुटका

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण शहरातील वाढत्या अनैतिक व्यवसायाला आळा घालण्यासाठी कल्याण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानक परिसरात वारांगना आणि दलालांची धरपकड केली. या कारवाईत ४ दलालांसह १० महिलांवर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, स्थानक परिसरात काही दलालांकडून महिलांना प्रवाशांकडे पाठवून देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

डोंबिवली मानपाडा रोडवरील रिगल बारमध्ये अश्लील धिंगाणा सुरू असल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात तब्बल २३ तरुणींची सुटका करण्यात आली. बारमधून ग्राहकांना महिलांची बेकायदेशीररीत्या उपलब्धता करून देण्याचा प्रकार सुरू असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी बार मॅनेजरसह संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. सुटका करण्यात आलेल्या महिलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना समुपदेशनासाठी पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.शहरातील अनैतिक व्यवसायाविरोधात अशा प्रकारची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

पोलिसांकडून कारवाई कुठे करण्यात आली?

कल्याण रेल्वे स्थानक परिसर आणि डोंबिवली येथील मानपाडा रोडवरील रिगल बारमध्ये कारवाई करण्यात आली.

पोलिसांकडून किती जणांवर गुन्हा दाखल झाला?

पोलिसांकडून ४ दलाल आणि १० महिलांविरोधात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Husband- Wife Relationship Tips: नात्यात 'या' 5 गोष्टींचा हिशोब ठेवताय? पार्टनरसोबत कायमचा दुरावा येण्याआधीच थांबवा हे काम

Maharashtra News Live Update: अंतरवाली सराटीत उद्यापासून मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण; ग्रामस्थांची जोरदार तयारी

Pune Crime: पुणे हादरले! अनैतिक संबंधातून भरचौकात तरुणाची हत्या, चाकूने सपासप वार करत संपवलं

OTT Releases: शुक्रवारचा प्लॅन ठरला! OTT वर पाहा ॲक्शनपासून हॉररपर्यंत ६ जबरदस्त चित्रपट

Pune : गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवलं, ६ जणांची ३३ लाखांची फसवणूक; पुण्यातील बंटी बबलीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT