MP Rahul Shewale
MP Rahul Shewale Saam Tv
मुंबई/पुणे

राहुल शेवाळेंनी अत्याचार केल्याचा आरोप; महिलेने थेट मुख्यमंत्री शिंदेंनाच लिहिले पत्र

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेना (ShivSena) खासदार राहुल शेवाळे यांच्यावर पोलीस गुन्हा दाखल करत नसल्याचे आरोप करत पीडित महिलेने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले असल्याची माहिती समोर आली आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्यावर बलात्कार करत, मानसिक त्रास दिल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे.

शेवाळे (Rahul Shewale) यांनी २०२० पासून लग्नाचे आमीष दाखवून आपल्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शेवाळे यांचे लग्न झाले असल्याची कल्पना होती. मात्र शेवाळे यांनी पत्नीसोबत वाद होत असून, लवकरच तिच्यापासून घटस्फोट घेणार असल्याची माहिती दिली त्यावर आपण विश्वास ठेवला, असंही यात म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र महिलेने सोशल मिडियावर प्रसिद्ध केले असून सोबत राहुल शेवाळे तिच्या वाढदिवसाला उपस्थित असल्याचा एक व्हिडिओही (Video) पोस्ट केला आहे. पोलिसांनी तक्रार न घेतल्यास आपल्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांशी (Police) याबाबत संपर्क केला असता, या प्रकरणाची कुठलिही तक्रार अद्याप आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच महिलेचे हे ट्विटर अकाऊंट अधिकृत आहे, का याची खात्रीही केली जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शेवाळे यांनी न्यायालयाच्या तक्रारीच्या आधारावर साकीनाका पोलीस (Police) ठाण्यात महिलेविरोधात खंडणी व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shamita Shetty : शमिता शेट्टी गंभीर आजाराशी देतेय झुंज, हॉस्पिटलमधून शेअर केला व्हिडीओ

Lok Sabha Election: भाजपला बहुमताचा आकडा गाठणं कठीण, अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी गावठी उपाय; आठवडाभरात व्हाल स्लिम-ड्रिम

Today's Marathi News Live : PM नरेंद्र मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर १५ मे रोजी पिंपळगाव बसवंत- जोपुळे रस्ता असणार बंद

Mumbai Local News : कल्याणच्या पुढे १५ डब्याची लोकल सेवा कधी धावणार? रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT