Eknath Shinde Faction Protest In Dombivli SAAM TV
मुंबई/पुणे

Dombivli Protest : राहुल गांधींच्या सावरकरांवरील वक्तव्यावर शिंदे गट आक्रमक; फोटोला जोडे मारले

डोंबिवलीत शिंदे गटाने राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

प्रदीप भणगे

Eknath Shinde Faction Protest In Dombivli : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात घमासान सुरू झालं आहे. भाजपसोबतच एकनाथ शिंदे गटाकडून राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीकेची झोड उठवली जात आहे. राज्यभर राहुल गांधींविरोधात आंदोलन होत असतानाच, डोंबिवलीतही एकनाथ शिंदे गट आक्रमक झाला. त्यांनी राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारून निषेध नोंदवला. तसेच राहुल यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

महाराष्ट्रात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा चर्चेत आली आहे. यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. त्याचवेळी त्यांनी सावरकर यांच्याबद्दल वक्तव्य केलं. त्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणारा आणि खोटा बदनामीकारक इतिहास सांगितला, असा आरोप करत डोंबिवलीत शिंदे गटातील नेते, पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. (Maharashtra News)

राहुल गांधींच्या फोटोला मारले जोडे

डोंबिवलीत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारले. यावेळी डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, राजेश कदम, कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील, सागर जेधे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. "राहुल गांधी यांचे वय नसेल तेवढी वर्षे सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली आहे. सावरकर यांच्याबद्दल बोलण्याची त्यांची कुवत नाही. म्हणून आज त्यांच्या वक्तव्याचा आम्ही जोडे मारो आंदोलन करत निषेध केला," असे शहरप्रमुख राजेश मोरे म्हणाले.

राहुल यांनी बिरसा मुंडा आणि सावरकरांवर केले भाष्य

बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी गौरव दिन म्हणून साजरी केली जाते. यावेळी राहुल गांधी म्हणाले, "बिरसा मुंडा एक इंचही मागे सरकले नाहीत. ते हुतात्मा झाले. ही तुमची (आदिवासींची) चिन्हे आहेत आणि तुम्हाला मार्ग दाखवतात. सावरकर हे भाजप-आरएसएसचे प्रतीक आहेत. ते दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यांनी दयेचे अर्ज लिहायला सुरुवात केली, " असे गांधी म्हणाले होते.

Edited By - Ruchika Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tanushree Dutta: 'फार्महाऊसवर न येता, तू हिरोईन...'; तनुश्री दत्ताने बॉलिवूडवर पुन्हा केले गंभीर आरोप

मुसळधार पावसानं पुण्यात दाणादाण, वाहनं अडकली, ट्रॅफिकला ब्रेक; थरकाप उडवणारी दृश्ये, VIDEO

Tallest Actor: बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन यांच्याही पेक्षा उंच अभिनेता कोण?

Friday Horoscope : प्रेमाचा वर्षाव होईल; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्याला कलाटणी मिळणार

Maharashtra Live News Update: पुण्याच्या बाणेरमधील रस्ता वाहतुकीसाठी ठप्प

SCROLL FOR NEXT