RAHUL GANDHI PUNE VISIT: ‘CHHATRON KI GOONJ’ PROGRAM, FADNAVIS’ DIG AT CONGRESS saam tv
मुंबई/पुणे

पुण्यात राहुल गांधींचा विद्यार्थ्यांशी संवाद, 'काँग्रेस नेत्यांच्याच कॉलेजमध्ये गुंज'

Rahul Gandhi to Meet 8,000-10,000 Students in Pune: विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. 'छात्रों की गूंज' कार्यक्रमासाठी काँग्रेसकडून जय्यत तयारी सुरू आहे. या कार्यक्रमात नेमका कुणाला प्रवेश मिळणार आहे? यावरून फडणवीसांनी राहुल गांधींना नेमका काय चिमटा काढलाय? पाहूयात हा रिपोर्ट........

Rohit Kadam

नीट पेपरफुटी प्रकरणावरून पेटलेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर देशातील शिक्षणव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. याच मुद्यावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी छात्रों की गुंज अभियान सुरू केलंय. 22 ऑगस्टला राहुल गांधींच्या पुण्यात कार्यक्रमाला पोलिसांनी सशर्त परवानगी दिलीये. मात्र, या कार्यक्रमासाठी विद्यार्थिनींना प्राधान्य देण्यात आलंय. मात्र यावरून राजकारण रंगलंय. काँग्रेस केवळ आपल्या नेत्यांच्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांचीच गुंज ऐकवणार असल्याचा चिमटा मुख्यमंत्री फडणवीसांनी काढलाय. तर त्यावर काँग्रेसनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार पलटवार केलाय.

दुसरीकडे, राहुल गांधींचा दौरा यशस्वी होण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी कंबर कसलीये. 22 ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी पुण्यातील एस.एस.पी.एम. मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पुण्यात राहुल गांधी हे सुमारे 8 ते 10 हजार विद्यार्थिनींशी थेट संवाद साधणार आहेत. या संवादादरम्यान, विद्यार्थिनी पेपरफुटी, शिक्षणाचा वाढता खर्च, रोजगार यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर राहुल गांधींना थेट प्रश्न विचारणार आहेत. त्यामुळे राजस्थानमधील कोटा येथून सुरू झालेल्या छात्रों की गूंज कार्यक्रमाला पुण्यात कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिपकेंकडून झेडपी शाळांचा पंचनामा सुरूच, आता राजीनामा महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्र्यांचा?

Maharashtra News Live Update: Pune: वाघोलीत प्रचंड वाहतूक कोंडी, वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षाचा नागरिकांना फटका

अ‍ॅप इंग्रजीत मग इंग्रजीतच बोलायचं, माजोरडा कॅबचालक आता मनसेच्या रडारवर

Heart Health Tips: हार्ट अटॅकचा धोका कमी करायचा? आहार-व्यायामासोबत रोजच्या सवयींमध्ये करा 'हे' ५ बदल

Jantar-Mantar Protest: जंतरमंतरवर लाठीमार व्हावा ही कॉक्रोच जनता पार्टीची इच्छा होती; केंद्रीय मंत्र्यांचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT