'संभाजी ब्रिगेड' महाराजांचा एकेरी उल्लेख कसा करु शकते?; गुणरत्न सदावर्तेंचा सवाल SaamTV
मुंबई/पुणे

'संभाजी ब्रिगेड' महाराजांचा एकेरी उल्लेख कसा करु शकते?; गुणरत्न सदावर्तेंचा सवाल

'एकेरी नाव असलेली संघटना असू शकत नाही, त्यांच्यावरती कारवाई व्हायला हवी; तसेच दहशतवाद पसरविणाऱ्या संघटना बंद केल्या पाहिजेत रजा अकादमी आणि यांच्यात काही फरक नाही.'

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : काल जेष्ठ संपादक गिरीश कुबेर (Girish Kuber) यांच्यावरती करण्यात आलेल्या शाईफेक प्रकरणावरती प्रतिक्रिया देताना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी संभाजी ब्रिगेडवरती निशाणा साधला आहे. ते म्हणाले, 'आज 6 डिसेंबर बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvana Din) आहे. बाबासाहेबांनी संविधानिक मूल्यं दिली आहेत. मात्र ती तुडवण्याचा प्रयत्न सरकारच्या आशिर्वादाने काल झाला, जेष्ठ संपादक गिरीश कुबेर यांच्यावर काही लोकांनी शाईफेक केली आहे. मात्र आमचं समर्थन कुबेर साहेबांना आहे' असं वक्तव्य वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunaratna Sadavarte) यांनी केलं. (Question of Gunaratna Sadavarten on 'Sambhaji Brigade')

हे देखील पहा -

'एखादं मत एखाद्याला चुकीचं वा योग्य वाटू शकतं असही ते म्हणाले. तसेच संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) ही संघटना संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख कसा करु शकते? याबाबत आम्ही पत्र दिलं आहे. एकेरी नाव असलेली संघटना असू शकत नाही, त्यांच्यावरती कारवाई व्हायला हवी असं देखील ते म्हणाले. शिवाय दहशतवाद पसरविणाऱ्या संघटना बंद केल्या पाहिजेत रजा अकादमी आणि यांच्यात काही फरक नाही असही सदावर्ते म्हणाले.

दरम्यान या सरकारमध्ये कायद्याचा गोंधळ आहे, त्यांनी याबाबत कोणाकडून तरी शहाणपण घ्यावं मराठ्यांसोबत (Maratha) राजकरण केलं, तस करू नका शरद पवारांच्या (Sharad Pawar) आशीर्वादाने चाललेल्या या सरकरमध्ये ओबीसीचा (OBC) छळ सुरू आहे, हेटाळणी केली जातं आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१७ व्या वर्षी वेश्याव्यवसाय, दुबईच्या बारमध्ये नाचली; दिग्दर्शकामुळे झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Shah rukh Khan: रिटायरमेंटचा सल्ला दिला, किंग खानने दिलं असं झणझणीत उत्तर की ट्रोलरची बोलतीच बंद!

Maharashtra Live News Update: विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी आज अमरावतीत

Duplicate Voter: एका मतदाराचं नाव दोन-दोन ठिकाणी कशी? मृतांचा आकडा वाढला कसा? आयोगानं सांगितली कारणं

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; वर्षश्राद्धाला जाताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT