Mumbai Airport: आई-मुलीला 25 कोटींच्या हेरॉईनसह अटक!
Mumbai Airport: आई-मुलीला 25 कोटींच्या हेरॉईनसह अटक! Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Airport: आई-मुलीला 25 कोटींच्या हेरॉईनसह अटक!

वृत्तसंस्था

मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या कारवाईत तब्बल 4.95 किलो हेरॉईन Heroin जप्त करण्यात आली आहे. जोहान्सबर्गहून आई-मुलीच्या भारतात आहे होते असे वृत्त आहे. तर या कारवाईत जप्त केलेल्या हेरॉईनची किंमत 25 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी महसूल गुप्तचर संचालनालयाने Directorate of Revenue Intelligence गुजरातमधील मुंद्रा बंदरावर सुमारे तीन हजार किलो हेरॉईन जप्त केले होते.

एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, कतार एअरलाइन्समध्ये Qatar Airlines प्रवास करणारी आई-मुलगी जोडी जोहान्सबर्गहून Johannesburg दोहा मार्गे मुंबईला Mumbai जात होती. सूत्रांच्या अहवालतात सांगण्यात येत आहे की, हि आई आणि मुलीची जोडी फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या उपचाराच्या नावाखाली दोघेही भारतात आले होते. एजन्सीच्या मते, तस्करांनी हेरोइन असलेली ट्रॉली बॅगमध्ये लपवून ठेवली होती. अधिकाऱ्यांनुसार, सहसा प्रवासी एकावेळी दोन किलोपेक्षा जास्त औषधे घेऊन प्रवास करत नाहीत.

प्रति ट्रिप 5000 डॉलरच देण्याचे आश्वासन;

तर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी Customs Officers दिलेल्या माहितीनुसार, हेरोइन भारतात आणण्यासाठी दोन्ही प्रवाशांना प्रति ट्रिप 5000 डॉलरच देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर विभागीय अधिकारी म्हणले की, "सीमाशुल्क अधिकारी भारतात ड्रग्स रॅकेटमध्ये सहभागी असलेले आणि इतरांचा शोध घेण्यासाठी तपास करत आहेत."

व्हिडीओ-

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

SCROLL FOR NEXT