पंतप्रधान मोदी आज अमेरिका दौऱ्यावर; UN महासभेला करणार संबोधित

पंतप्रधान मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची पहिल्यांदा भेट घेतील.
पंतप्रधान मोदी आज अमेरिका दौऱ्यावर; UN महासभेला करणार संबोधित
पंतप्रधान मोदी आज अमेरिका दौऱ्यावर; UN महासभेला करणार संबोधितSaam Tv
Published On

विहंग ठाकूर

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी Nrendra Modi 22 सप्टेंबर रोजी अमेरिकेला America जात आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवालही त्यांच्यासोबत या दौऱ्यावर असतील. अमेरिकेत पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेलाही संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची पहिल्यांदा भेट घेतील.

हे देखील पहा-

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि पंतप्रधान मोदी भेट;

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पंतप्रधान मोदींना व्हाईट हाऊसला भेट देण्याचे औपचारिक निमंत्रण दिले आहे. 24 सप्टेंबर रोजी दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल. यामध्ये व्यापार आणि सुरक्षा यासारख्या मुद्यांवर चर्चा होऊ शकते. अफगाणिस्तान आणि आसपासच्या परिसराच्या परिस्थितीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. सीमापार दहशतवाद आणि कट्टरता यासारख्या मुद्द्यांवरही व्यापक चर्चा केली जाईल. राष्ट्रपती झाल्यावर जो बिडेन यांच्यासोबत पंतप्रधान मोदींची ही पहिली भेट आहे.

पंतप्रधान मोदी आज अमेरिका दौऱ्यावर; UN महासभेला करणार संबोधित
Beed: धारूर घाटात अपघातांची मालिका; साखर घेऊन जाणारा ट्रक पलटला!

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यासोबत भेट घेणार;

पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यासोबत भेट घेतील. या व्यतिरिक्त, क्वाड शिखर परिषद व्हाईट हाऊस White House येथे आयोजित केली जाईल. जिथे चार देशांच्या (अमेरिका , भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया) नेत्यांची प्रथमच फिजिकल बैठक होईल. तसेच पीएम मोदी क्वाड समिटमध्येही सहभागी घेणार आहेत.

संयुक्त राष्ट्र महासभा सुरू होण्यापूर्वी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले. तेथे त्यांनी नॉर्वे, इराक आणि ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली. या बैठकीत ब्रिटनसोबत 2030 च्या रोडमॅपवर चर्चा करण्यात आली.

संयुक्त राष्ट्र संघाची 76 वी महासभेमध्ये अफगाणिस्तान, हवामान बदल आणि कोरोना बद्दल चर्चा होऊ शकते. पंतप्रधान मोदी 25 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करतील.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com