Punes Dhanakwadi Area Crime News Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Crime: एकांतात मिठी अन् विनयभंग, पत्रिका पाहून भविष्य सांगण्याचा दावा; पुण्यात भोंदू ज्योतिषाची पोलखोल

Astrologer Arrested After Shocking Incident in Pune: पुण्यातील धनकवडी भागात भोंदू ज्योतिषाने तरुणीला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. शहरात संतापाची लाट उसळली आहे.

Bhagyashree Kamble

अक्षय बडवे, साम टिव्ही प्रतिनिधी

तरूणीला एकांतात मिठी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या भोंदू ज्योतिषाला अटक करण्यात आली आहे. हा संतापजनक प्रकार पुण्यातील धनकवडी परिसरात घडली आहे. या प्रकारानंतर तरूणीनं भावाला फोनवर घटनेची माहिती दिली. त्यानं थेट सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी कारवाई करत, आरोपीच्या कार्यालयावर छापा टाकत भोंदूला अटक केली आहे.

अखिलेश लक्ष्मण राजगुरु असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरूणीला तिच्या मैत्रिणीनं 'या ज्योतिषी पत्रिका पाहून भविष्य सांगतात, त्याच्यांकडे जाऊन ये', असं सांगितलं होतं. १२ जुलै रोजी तरूणी तिच्या भावाची पत्रिका भोंदू ज्योतिषाकडे घेऊन गेली.  पत्रिका पाहिल्यानंतर ज्योतिषाने "तुमच्या भावाला एक वनस्पती द्यायची आहे. ती मागवा आणि माझ्याकडे या", असं त्यानं सांगितलं.

१९ जुलै रोजी फिर्यादी ज्योतिषाच्या कार्यालयात गेली. नंतर ज्योतिषाने “मंत्र म्हणताना वनस्पती डोक्यावर ठेवावी लागेल” असं सांगत एकांताची मागणी केली. तरुणीला संशय येताच तिनं जागेवरून लगेच तातडीनं काढता पाय घेतला. त्याचवेळी आरोपीने अचानक तिला मिठी मारली आणि विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक प्रकारानंतर तरुणीने आपल्या भावाला फोनवर घटनेची माहिती दिली.

ज्योतिषाविरोधात भावानं आणि तरूणीनं सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार देताच सहकारनगर पोलिसांनी त्याच्या कार्यालयावर छापा टाकला. तसेच अखिलेश राजगुरु याला बेड्या ठोकल्या. या घटनेमुळे पुणे शहरात संतापाची लाट उसळली आहे. अंधश्रद्धा आणि महिलांवरील अत्याचार याविरोधात कडक पावले उचलण्याची मागणीही जोर धरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Ganeshutsav : पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीबाबत पोलिसांचा मोठा निर्णय

बलात्कार पीडितेला आरोपीच्या घरी पाठवलं, नराधमानं पुन्हा केले अत्याचार, बालकल्याण समितीच्या अध्यक्षांसह १० जणांवर गुन्हा

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी चुकूनही करु नये 'या' गोष्टी, अन्यथा...

Maratha Reservation: मुंबईत आंदोलनांवर बंदी घालावी; मिलिंद देवरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Pune : पुण्यात विसर्जनानंतर मूर्तींचे छायाचित्रण आणि प्रसारणास मनाई; प्रशासनाचा आदेश, उल्लंघन केल्यास...

SCROLL FOR NEXT