Pune Weather 
मुंबई/पुणे

Pune Weather: पुणेकरांचा श्वास गुदमरला, 'या' ठिकाणाची हवा सर्वात प्रदूषित

Pune Weather: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.

Dhanshri Shintre

पुणे शहरातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात सर्वात जास्त हवा प्रदूषित झाल्याचे समोर आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हा चौक हा काही वर्षापासून शहरातील हवा प्रदूषणाचा टॉपचा हॉटस्पॉट झालेला आहे. कारण या चौकात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.

या ठिकाणी अति सूक्ष्म धुलिकणांचे प्रमाण ९९ मायक्रो ग्रॅम प्रति चौरस मीटर इतके वाढले आहे. हे प्रमाण ६० इतके असायला हवे मात्र ते पावणेदोन पटीने वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावर रेस्पायर सायन्ससेस नावाचे हवामान विषयक स्टार्टअप २०१७ पासून कार्यरत आहे. त्यांच्यासोबत गुगल मॅपने हवा प्रदूषण मोजण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.

यात देशातील सुमारे १५० शहरांच्या हवेच्या गुणवत्तेचा अहवाल ही संस्था दर महिन्याला देत आहे यात पुणे आणि पिंपरी चिंचवडचा समावेश आहे. दरम्यान, आज मुंबईत २०.९९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हवामान खात्याच्यामते, ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान २५.७४ सेल्सिअस राहण्याता अंदाज आहे.

रविवारी सांताक्रूझ वेधशाळेत कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33.7 अंश सेल्सिअस आणि 17.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले आणि नोव्हेंबरच्या मध्यात पारा 15- 16 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. मात्र, डिसेंबरचा पहिला आठवडा या महिन्यातील आतापर्यंतचा सर्वात उष्ण दिवस ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलीला पालकांसोबत राहण्यास जबरदस्ती करता येणार नाही; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

Post Office: पोस्ट ऑफिसच्या नियमात मोठा बदल, सुकन्या योजना ते पीपीएफवर होणार परिणाम

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये महायुतीतील वादात स्थानिक पदाधिकाऱ्यांची उडी,शिवसेनेचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

MPSC आंदोलनावरून उच्च न्यायालयाची राज्य सरकारसह आयोजकांना नोटीस

Pune village : मोरांचे नंदनवन! पुण्यातील 'या' ठिकाणी अनुभवता येईल गावाकडचा आनंद

SCROLL FOR NEXT