Ajit Pawar And Sharad Pawar NCP Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune ZP Election Result : पुण्यात भाजपाला धक्का! जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर

Pune ZP Election Result : पुणे जिल्हा परिषद निवडणूक निकाल जाहीर होत असून उत्तर पुण्यात टपाली मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे. झेडपी निकालांचे सविस्तर अपडेट वाचा.

Alisha Khedekar

राज्यात महापालिका निवडणुकांनंतर झेडपी निवडणुकांसाठी हाय होल्टेज लढत पाहायला मिळत आहे.एकीकडे पुण्याच्या महापौर पदी अद्यापही कोणाची निवड झाली नसून दुसरीकडे आज सकाळी १० वाजल्यापासून १२ जिल्हा परिषदेसाठी ७ तारखेला पार पडलेल्या मतदानाचा निकाल पाहायला मिळतो आहे. यामध्ये उत्तर पुण्यात टपाली मतदानात NCP आघाडीवर आहे. पुण्यात अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर पहिल्यांदाच निवडणूक होत आहेत.

पुण्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या. सोलापूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खाते उघडले असून उत्तर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे. यामध्ये जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड यांच्या टपाली मतमोजणी जास्त मतांनी आघाडी आहे. पुण्यात एकूण ७३ जागांसाठी लढत आहे. त्यात राष्ट्रवादी ३६ मतांनी आघाडीवर आहे. सर्वाधिक कमी मते काँग्रेसला आहेत, त्यामुळे काँग्रेस पिछाडीवर आहे. तर पंचायत समितीच्या एकूण १४६ जागांपैकी ७२ ठिकाणी राष्ट्रवादीची आघाडी, ४८ जागांवर भाजपा आघाडीवर. दरम्यान पुण्यात कोणाचा विजय होणार आणि कोणाला हार पत्करावी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पुणे जिल्हा परिषद पक्ष जागा आघाडी

एकुण जागा - 73

भाजप- 17

शिवसेना-12

राष्ट्रवादी- 36

शरद पवार गट - 5

ठाकरे गट-2

काँग्रेस-1

इतर-0

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात विषारी दारुचे 14 बळी, पुणे पोलीस करतायत तरी काय, संतप्त नागरिकांनी दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त!

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

Maharashtra News Live Update: पुणे विषारी दारू प्रकरण, दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

भाजपचा दणदणीत पराभव! 'आप'चा 900 जागांवर विजय, काँग्रेसची अवस्था काय?

Avoiding Chips and Cold Drink: चिप्स खाणं आणि कोल्ड ड्रिंक्स पीणं २१ दिवस बंद केल्यावर शरिरावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT